आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांसमोर नोटा संपल्याचे बोर्ड झळकू लागले, बहुुतांश एटीएममध्येही झाला खडखडाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आठवडाभरा पासून बँकेत नोटांचा तटवडा जाणवत होता. परंत आता नोटा संपल्याचेच बोर्ड शहरातील बँकांसमोर झळकू लागले आहेत. त्यामळे दैनंदिन व्यवहार करणे लोकांना गैरसोयीचे झाले आहे. टंचाईच्या सरुवातीला बँकांनी एका व्यक्तीला केवळ दहा हजार रुपयेच मिळतील असे बोर्ड लावले होते. आता मात्र, नोटाच संपल्याचे बोर्ड लागत आहेत. एक डिसेंबरपासून शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास सरुवात झाली आहे. सरुवातीला १० ते २४ हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जात होती. बँकांमधील रक्कम संपली आहे.

सेंट्रल बँकेच्या तिजोरीत खडखडाट... टीव्हीसेंटर येथील रंजनवन सोसायटीमधल्या सेंट्रल बँक अॉफ इंडियाने मंगळवारी ब्रँच इज ऑऊट ऑफ कॅश असा बोर्ड लावला आहे. याबाबत बँकेचे वरिष्ठ प्रबंधक कुमार गौरव यांनी सांगितले, गेल्या दोन दिवसांपासून बँकेला दररोज मख्य कार्यालयाकडून किमान दहा लाखांची रक्कम दिली जात होती. मात्र मंगळवारी रक्कमच मिळाली नाही. त्यामळे बँकेला तसा बोर्ड लावणे भाग पडले. या बँकेत पेन्शनर्सची संख्या मोठी असल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. शहरात एकमेव एस.बी.आय.च्या बँकांमध्ये २४ हजार रुपयांचे वितरण करण्यात येत आहे. त्यामळे या बँकांच्या ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळत आहे. ही बँक सातत्याने ग्राहकांना २४ हजार रुपये देत असल्यामळे यांचीही रक्कम संपत आली असून, दोन दिवसांनंतर टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एटीएमवर ही परिणाम : रकमेअभावीशहरातील एटीएम ड्राय होत आहेत. अनेक एटीएममध्ये काही दिवसांपासून पैसेच वितरित होत नाहीत. बँक ऑफ महाराष्ट्रने गेल्या पाच दिवसांपासून एटीएममध्ये रक्कम भरणाऱ्या एजन्सींना नोटा दिल्यामळे त्यांचे काही एटीएम ड्राय झाले आहेत. मंगळवारी शहरातील २५ टक्केच एटीएम सरू होते

आढावा घेणार: नोटांचा तटवडा कायम राहिल्यास काही बँकामध्ये वाद होऊ शकतात, असे विचारले असता,पोलिस आयक्त अमितेशकुमार म्हणाले, बँकांकडून माहिती घेऊन बधवारीच बैठक आयोजित केली जाईल.
तीन दिवसांनंतर परिस्थिती बिघडेल...
गेल्या आठवड्याभरापासून बँकांना चलन तटवडा जाणवत आहे. त्यामळे बँकांनी रक्कम संपल्याचे बोर्ड लावण्यास सरुवात केली आहे. येत्या तीन दिवसांत बँकांना आर.बी.आय.कडून रक्कम मिळाली नाहीतर सर्वच बँकांवर असे बोर्ड लावण्याची पाळी येईल - रवी धामणगावकर,उपमहासचिव, एस.बी.एचस्टाफ असोसिएशन
बातम्या आणखी आहेत...