आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांमुळे विमानाला उशीर नाहीच, दिल्लीच्या मुख्यालयाला पाठवला अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीवर १४ जून रोजी कुत्रे आल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाल्याचा आरोप केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) धुडकावला आहे. स्थानिक शाखेने मुख्यालयाला पाठवलेल्या अहवालात त्या रात्री धावपट्टीवर एकही कुत्रे नसल्याचे ९३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. विमानतळ प्राधिकरणाने केलेल्या आरोपांच्या चाचपणीसाठी सीआयएसएफतर्फे एक समिती स्थापन करण्यात आली. समितीने विमातनळावरील ९३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. मात्र, यात एकही कुत्रे धावपट्टीवर आढळले नाही. तसा अहवाल स्थानिक अधिकाऱ्यांनी मुख्यालयाला पाठवल्याची माहिती, सीआयएसएफचे डिप्युटी कमांडेट हेमेंद्र सिंग यांनी ‘दिव्य मराठी’ला दिल्ली मुख्यालयातून दिली.

आरोप-प्रत्यारोप
१४जून रोजी विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रे शिरल्याने मुंबईकडे जाणारे विमान एक तास उशिरा झेपावल्याचा आरोप झाला होता. सीआयएसएफच्या दुर्लक्षामुळे धावपट्टीवर कुत्रे आल्याचा आरोप प्राधिकरणाकडून करण्यात आला. त्याला सीआयएसएफने अहवालातून प्रत्युत्तर दिले आहे.

जबाबदारी नाही
कुत्रे रोखण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. मात्र, आम्ही जबाबदारी झटकतो असे नाही. कुत्रे आत आले तर ते हाकलण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करतच आलोय. कुत्रे किंवा अन्य जनावर आत घुसू नये यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी विमानतळ प्राधिकरणाची आहे.

९२ सीसीटीव्हींचे फुटेज तपासले
औरंगाबाद कार्यालयाकडून९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. यात धावपट्टीवर दिवसभरात एकही कुत्रे दिसले नाही. कुत्र्यामुळे विमानाला उशीर झाल्याचा आरोप चुकीचा आहे. विमातनळाची सुरक्षा आमची जबाबदारी आहे. गेटमधून कु़त्रे घुसू नये याकडे आम्ही लक्ष देतो. पण जर गेटचे छिद्र दुरुस्त करण्याचे काम प्राधिकरणाचे आहे. -हेमेंद्र सिंग, डेप्युटी कमांडेट, सीआयएसएफ
बातम्या आणखी आहेत...