आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना हुंडा, ना मानपान, मुलीच्या लग्नात पुस्तकरूपी कन्यादान; विवाहस्थळी पुस्तकांचे प्रदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लग्न म्हटले की सुरुवात होते हुंड्यापासून! नंतर मानपान, आहेर आणि बडेजावपणाचा थाटमाट. पण, औरंगाबाद शहरात असे एक लग्न होत आहे, ज्यात केवळ पुस्तकांचीच चलती असेल. वधू-वरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन, कन्यादान म्हणून मुलीला आणि जावयाला पुस्तकांची भेट आणि जेवणावळीच्या स्टॉलजवळच असेल विविध प्रकाशनांचे भव्य पुस्तक प्रदर्शन! 
 
उद्योजक अर्थशास्त्रीय घडामोडींचे अभ्यासक डी. एस. काटे यांच्या कन्या सायली आणि नाशिक येथील सूर्यकांत पवार यांचे चिरंजीव अजिंक्य यांचा हा विवाहसोहळा रविवार, १८ जून रोजी गुरू लॉन्स येथे संध्याकाळी सात वाजता होत आहे. सायली अजिंक्य हे दोघेही उच्चविद्याविभूषित असून त्यांनीही या अनोख्या लग्नसोहळ्याला होकार दिला आहे. 
 
वधू-वरांच्याहस्ते प्रकाशन : डी.एस. काटे यांनी लिहिलेल्या अर्थजागर या पुस्तकाचे प्रकाशन विहाहस्थळी वधू-वरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी इच्छुकांना या पुस्तकाच्या प्रती मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच मुलीला कन्यादान म्हणून विविध प्रकाशनांची गाजलेली पुस्तके दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे लग्नामध्ये भांडीकुंडी इतर मानाच्या वस्तू दिल्या जाणार नाहीत. 
 
एक लाखाची पुस्तके वाटणार : लग्नानिमित्त एक लाख रुपयांची विविध पुस्तके गरजू विद्यार्थी वाचनालयांना देण्याचा संकल्प काटे कुटुंबीयांनी केला आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी पुस्तके, मराठी साहित्यातील दर्जेदार पुस्तके असतील, असे डी. एस. काटे यांनी सांगितले. 
 
भव्य पुस्तक प्रदर्शन 
एरवी कुठल्याही कार्यक्रमानिमित्त पुस्तक विक्रेत्यांची हेळसांड होते. कार्यक्रमस्थळी दारासमोर चटई टाकून त्यावर पुस्तके मांडून खरेदीदारांची वाट पाहावी लागते. मात्र, या विवाहाच्या निमित्ताने काटे कुटुंबीयांच्या वतीने पुस्तक विक्रेत्यांचा सत्कार करून त्यांना सुयोग्य असे स्टॉल मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात विविध प्रकाशनांची, लेखकांची पुस्तके असतील. 
 
आहेर नको, पुस्तके घ्या
लग्नामध्ये नातेवाईक मित्रांकडून वस्तू रोख स्वरूपात आहेर देण्याची प्रथा आहे. लग्नावेळी जी मंडळी असा आहेर घेऊन येतील, त्यांना आहेर देण्याऐवजी तेवढ्याच पैशांची पुस्तके विकत घ्या, असा सल्ला दिला जाणार आहे. यातून बरेच जण पुस्तके विकत घेतील आणि स्वत:सह मुलांना इतर गरजूंना देऊ शकतील. 

पुढील स्लाइडवर वाचा... वाग्दत्त वधू म्हणाली... माहेरातून विचारांचे धन घेऊन सासरी जाणार
बातम्या आणखी आहेत...