आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडेजावपणा अन् मानपानाला फाटा रेशीमगाठीत शोधल्या सामाजिक वाटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न समारंभ म्हटले की थाटमाट, मानपान आणि मोठेपणा… पण आता हा प्रकार कमी होतोय. लग्नाच्या निमित्ताने नव्या सामाजिक वाटा शोधण्याचे सकारात्मक पाऊल पडताना दिसत आहे. काहीजण लग्नपत्रिकांवर सामाजिक संदेश छापतात, काहीजण तर लग्नपत्रिकांवर होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी पेपरलेस इन्व्हिटेशन देण्याकडे वळत आहेत. याशिवाय लग्नामध्ये भरमसाट पदार्थांच्या मेजवानीवर निर्बंध आणून मोजकेच पदार्थ ठेवत उष्टावळीला लगाम घालणे, सामाजिक कार्यासाठी रोख स्वरूपात आहेर स्वीकारणे, आलेल्या पाहुण्यांना पुस्तके अथवा रोपटे देऊन स्वागत करणे, असे सामाजिक उपक्रम वाढत आहेत. अशा सकारात्मक विचारांना आणखी चालना मिळावी म्हणून त्याचा घेतलेला हा मागोवा...
यांनी शोधल्या नव्या वाटा
‘शिवाजी कोण होता’ देऊन स्वागत
शहरातीलपल्लवी कांबळे डॉ. अनिल बनकर यांनी विवाहप्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांना कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’, हे पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले. प्रथेनुसार पाहुण्यांना गमजा-टोपी देऊन स्वागत केले जाते. मात्र, या दांपत्याने ही प्रथा कालबाह्य ठरवत पुस्तके भेट देऊन अनोख्या पद्धतीने पाहुण्यांचा सन्मान केला.

दुष्काळग्रस्तांसाठी वह्यांचे संकलन
कंपन्यांमध्येनोकरी करणाऱ्या काही लोकांनी एकत्र येऊन ‘माधव सोशल ग्रुप’ नावाचा एक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपचे एक सदस्य मोहन कोलते यांचे नुकतेच लग्न झाले. त्यांनी लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना लग्नात आहेर देऊ नका. पण तरीही एखादी भेट म्हणून काही द्यायचेच असेल तर वह्या द्या, असे आधीच सांगितले होते. त्यानुसार आलेल्या पाहुण्यांकडून तब्बल १२०० वह्या जमा झाल्या. आता या वह्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

उरलेलं अन्न पोहोचते गरजूंपर्यंत
औरंगाबादशहरात ७० मंगल कार्यालये आहेत. मोठी लग्नतिथी असेल तर किमान आठ ते दहा हजार लोकांना पुरेल, एवढे अन्न या मंगल कार्यालयांमध्ये शिल्लक राहते. हे अन्न जमा करून घाटी रुग्णालय रोटी बँकेत पोहोचवण्याचे काम शहरातील ‘अन्न वाचवा समिती’ करते. सर्व मंगल कार्यालयांच्या स्वयंपाकगृहात अन्न वाचवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक लावण्यात आलेले आहेत. या नंबरवर फोन केला की लगेच ऑटोरिक्षा येऊन अन्न घेऊन जाते गरजूंना ते वितरित करते.
पुढे वाचा... पत्रिकेऐवजी पुस्तकांद्वारे निमंत्रण, मारवाडी समाजाने शाखेच्या भिंती तोडल्या, अक्षता वाचवण्यासाठी अभियान, जेवणावळीसाठी आचारसंहिता

बातम्या आणखी आहेत...