आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Existence Without Prove Ourself In Competition Nishigandha Wad

स्वत:शी स्पर्धा केल्याशिवाय अस्तित्व टिकू शकत नाही : डॉ. निशिगंधा वाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीए परिषदेत बोलताना अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड. व्यासपीठावर मान्यवर.
औरंगाबाद - पदव्या लावल्यामुळे कधीही सशक्तीकरण होत नाही, तर आपण आयुष्यात किती माणसे वाचायला शिकलो, स्वत:मधील किती अवगुण दूर केले हे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण स्वत:शी स्पर्धा करत नाही, तोपर्यंत अस्तित्व टिकू शकत नाही, असे मत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले.

इंडियन चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया औरंगाबाद शाखेने बीड बायपास येथील आयसीए भवानात विभागीय महिला परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर शाखेचे अध्यक्ष पंकज कलंत्री, उपाध्यक्ष सीए रेणुका देशपांडे, सचिव सीए रोहन आंचलिया, कोशाध्यक्ष सीए अल्केश रावका, महिला सशक्तीकरण समितीच्या प्रमुख सीए रूपाली बोथरा यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. वाड म्हणाल्या, तनमन प्रसन्न असेल तर तो आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. शिक्षणामुळे माणसात बदल घडून येतो. आज महिला सशक्तीकरणावर बोलले जाते, परंतु पदवी नावासमोर लावून सशक्तीकरण होत नाही. त्यापेक्षा आपण किती माणसे वाचायला शिकलो हे महत्त्वाचे आहे. स्त्री ही स्त्रीची शत्रू नसते, असेही त्या म्हणाल्या. जीवनाची दोन चाके असतात. तो-ती असे करता चांगले जीवन जगणे आवश्यक असते. स्त्रीने आपले अधिकार ओळखून पुढे जायला हवे. स्त्री ही घरी असली तरी तरी कर्तृत्ववान आणि सशक्त आहे. प्रत्येक व्यक्तीने चांगले गुण हेरून पुढच्या पिढीसाठी वापरले पाहिजेत. त्यासाठी स्वत:शी स्पर्धा केल्यानंतरच अस्तित्व टिकेल. आई-बाबांनी आपल्या मुलांसाठी संकटात ढाल होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. सीए रेणुका देशपांडे म्हणाल्या, २१ व्या शतकात महिलांमध्ये प्रतिभा आणि प्रचंड ऊर्जा आहे. महिला त्याचा योग्य वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेत महिलांसमोरील आव्हाने, महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेत पुणे, मुंबई, जालना, नागपूर, बीड आदी ठिकाणांवरून महिला प्रतिनिधींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता भारतीया, मीनल नाईक यांनी केले. खुशी कोठारे यांनी आभार मानले.