आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Facilities For Government Election People In Aurangabad

मनपा निवडणूक: निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांची अवहेलना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक मध्ये ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना गैरसोयींना तोंड देत काम करावे लागत आहे. अन्नपाण्याविना रात्री दोन वाजेपर्यंत कामे सुरू असल्याने संतापलेल्या महिला उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी थेट निरीक्षकांकडे तक्रार केली आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेतील ११३ वॉर्डांची विभागणी बारा प्रभागांत करण्यात आली आहे. प्रभाग एकमध्ये अकरा वॉर्ड आहेत. आकारमान लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे वॉर्ड असलेला हा प्रभाग आहे. ताठे मंगल कार्यालयात या प्रभागाचे कार्यालय निवडणुकीसाठी दिले आहे. ३८ अंश तापमान असतानाही कर्मचारी सकाळी आठ ते रात्री दोन वाजेपर्यंत राबत आहेत.

कर्मचाऱ्यांची उपासमार

३० मार्चपासून २३ एप्रिलपर्यंत अकरा अधिकारी अन् दहा शिपाई या प्रभागात जवळजवळ मुक्कामीच आहेत. येथे त्यांना यमयातना भोगाव्या लागत असल्याच्या भावना कर्मचाऱ्यांनी "दिव्य मराठी'कडे व्यक्त केल्या. प्यायला पाणी नाही, थकवा आल्यास साधा चहादेखील मिळत नाही. जेवण तर फार दूरची गोष्ट. अशा स्थितीत या प्रभागात काम सुरू आहे. महापालिकेचे काम असले तरी तुम्ही शासनाचे काम करताय ना, मग तुमचे तुम्ही बघून घ्या, असे सांगून पालिका प्रशासन सरकारी कर्मचाऱ्यांची अवहेलना करीत आहे.

स्वत:च्या जबाबदारीवर आणले साहित्य

याकर्मचाऱ्यांना अत्यंत ओंगळवाण्या, अजागळ बेशिस्त पद्धतीने या प्रभाग कार्यालयात सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. परंतु उपजिल्हाधिकारीपदी काम केलेले अधिकारी या ठिकाणी आल्याने त्यांना ही बेशिस्त आवडली नाही. या ठिकाणी केवळ दोन संगणक, एक प्रिंटर दिले होते. परंतु ते कमी पडतील, असा अंदाज येताच निवडणूक निर्णय अधिकारी अंजली धानोरकर यांनी स्वत:च्या जबाबदारीवर एक स्कॅनर बारा अतिरिक्त कर्मचारी घेतले. तसेच कूलर, पंखे, मंडप यांची सोय करून घेतली.

अन्नपाण्या विनाकाम कसे करणार ?

ज्या प्राथमिक सुविधा मनपा प्रशासनाने पुरवायल्या हव्यात, त्यातील एकही सुविधा आमच्या प्रभागास दिलेली नाही. पाणी, चहा जेवणदेखील नाही. साहित्याची तर वानवाच आहे. याविषयी मी स्वत: निरीक्षकांकडे तक्रार केली आहे. अंजलीधानोरकर, निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग एक
वाहनासाठी झोन अधिकाऱ्यांची आयोगाकडे तक्रार

मनपा उपायुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत बारा प्रभागांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वाहन देण्यास विरोध करण्यात आला. वाहन द्यायचे असल्यास २१ एप्रिल रोजी दिले जाण्याचा निर्णय घेऊन तो अधिकाऱ्यांना देण्याची सूचना निवडणुकीच्या कामात तैनात करण्यात आलेल्या मनपा अधिकाऱ्यांना देण्यात आली. या निर्णयाच्या विरोधात सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका अधिकाऱ्याकडे असलेल्या प्रभागात दहा ते बारा वॉर्ड असून स्थळपाहणी करावयाची असल्यास त्यांना ते करणे अशक्य होईल. काही घटना घडल्यास अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाता येणार नाही, अशा सर्व बाबी तक्रारीत नमूद करण्यात आल्या आहेत.