आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा हद्दीत सुविधा मिळेना, तक्रारी करूनही दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक १०० ज्योतीनगर, दशमेशनगर अंतर्गत येणाऱ्या किनकोरबेननगरात नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गट क्रमांक ७० या ३० एकर जागेत तब्बल ७० घरे उभारण्यात आलेली आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीत येत असलेल्या या भागात अद्यापही नागरिकांना पाणी, रस्ते, ड्रेनेजलाइन, पथदिवे यापासून वंचित राहावे लागत आहे. मालमत्ता कर भरण्यास नागरिक तयार असतानाही महानगरपालिका कर लावत नाही.
२००२ मध्ये ही वसाहत स्थापन करण्यात आली आहे. अद्यापही या भागाचा विकास झालेला नाही. नागरिकांना पिण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आलेली नसल्यामुळे बोअरिंगवर अवलंबून राहावे लागत आहे, परंतु उन्हाळा असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. पथदिवे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेने लक्ष घालून जलवाहिनी टाकून देण्यात यावी, रस्त्याचे डांबरीकरण करावे, पथदिवे लावावेत, अशी मागणी सुधाकर पटेल, भाग्यवान पटेल, डॉ. राजेश पटेल, मंगेश जरीवाला आदींनी केली.
- महानगरपालिकेकडे हा भाग आलेला आहे. सुरुवातीला ड्रेनेजलाइन, पथदिवे बसविण्यात आलेले होते. आता आमच्या भागात पुन्हा आल्यामुळे याकडे लक्ष देऊ.
सुमित्रा हळनोर, नगरसेविका
त्या भागाकडे लक्ष देऊ
- मागील काही वर्षांपासून पालिकेला वारंवार निवेदन, तक्रारी दिल्या, परंतु मनपा याकडे दुर्लक्ष करत आहे. २००२ पासून या ठिकाणी कोणताही विकास झालेला नाही. मालमत्ता कर भरण्यास आम्ही तयार असताना पालिका टॅक्स लावत नाही. पाणी नसल्यामुळे बोअरिंगचे पाणी प्यावे लागते. पथदिवे बंद असतात. पालिका काही करत नसल्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. सुधाकर पटेल

दिव्य मराठी हेल्पलाइन
तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमच्या प्रतिनिधींना ९७६५०७०३३३, ९०२८०४५१९९ या मोबाइल क्रमांकांवर समस्या कळवा.
बातम्या आणखी आहेत...