आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#NoFakeNews: औरंगाबादेत पैश्यांचा पाऊस, जाणून घ्या बातमीपलिकडचे सत्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील चिकलठाणा परिसरात कथित 2000 आणि 500 च्या नवीन नोटांचा ढीग सापडला अशा प्रकारचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी काहींनी ह्या नोटा खऱ्या असल्याचा दावा केला. तर, काहींनी त्या बनावट असून कुणीतरी छापून फेकून दिल्या असा दावा केला. मात्र, या मागचे सत्य DivyaMarathi.com आपल्यासमोर आणत आहे. 
 

व्हायरल होणाऱ्या बातम्यांमध्ये काय?
- फेसबूक आणि ट्वीटरसह अनेक माध्यमांमध्ये सुद्धा औरंगाबादच्या नोटांच्या पावसाची बातमी पसरली. त्यानुसार, चिकलठाण परिसरात नोटांचा ढीग सापडला. हे पाहताच स्थानिकांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी थांबून येथे गर्दी केली. अनेकांनी नोटा उचलल्या. 
- काहींनी दिलेल्या वृत्तानुसार, लोकांनी ह्या नोटा उचलून बँकेत जमा करण्यासाठी गर्दीही केली आणि त्यानंतर ह्या नोटा बनावट असल्याचे समोर आले. 
- व्हायरल झालेल्या वृत्तांमध्ये कॉमेंट सुद्धा आले. त्यामध्ये एकाने ह्या नोटांचा गौडबंगाल प्रशासन आणि सरकार लपवत असल्याचा आरोप केला. एका माध्यमाने तर या वृत्ताखाली, पोलिस बनावट नोटा आल्या कुठून याचा कसून शोध घेत आहेत असा दावा केला. 
 

समोर आलेले सत्य
नोटांचा ढीग हा चिकलठाणा परिसरात सापडला होता. याच परिसरात प्रोझोन हा शॉपिंग मॉल आहे. शॉपिंग मॉलमध्ये नुकताच 'पैसों का पेड' एक कार्यक्रम पार पडला. त्याचे आयोजन माय एफएम या खासगी एफएम वाहिनीने केले होते. कार्यक्रमात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम स्टेजचे छत हे बनावट 2000 रुपयांच्या नोटांपासून तयार करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर स्टेज मोडण्यात आला. त्याच्याच कचऱ्याचा ढीग औरंगाबादच्या चिकलठाण परिसरात पडलेला होता. त्यावरूनच ह्या सर्व प्रकारच्या अफवा आणि व्हायरल मेसेज तयार झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...