आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीचे परीक्षा शुल्क माफ, मुदतही वाढवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळीपार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले आहे. शिवाय परीक्षा शुल्कासह अर्ज भरण्याची ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत वाढवून २३ नोव्हेंबर केली आहे. अद्यापही काही विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू शकल्यामुळे ते परीक्षेपासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना विलंबासह ३० नोव्हेंबरपर्यंत परीक्षा अर्ज सादर करता येतील. राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्यात तर शेतकरी, शेतमजुरांची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
तद्वतच एसटीचा पास संपला, आता पुढील शिक्षण घेणे कठीण होईल म्हणून मराठवाड्यातील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरणही ताजे आहे. राज्य सरकारवर दबाव वाढल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने रविवारी (१ नोव्हेंबर) जारी केलेल्या परिपत्रकानुसार ऑनलाइन परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय कुठल्याही विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची गरज नाही.