आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Injustice On Old Party Workers Bala Nandagaonkar

नवीन कार्यकर्त्यांना सामावून घेताना जुन्यांवर अन्याय होणार नाही - बाळा नांदगावकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर - महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणा-या नवीन कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेताना जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी गंगापूर येथे आयोजित गंगापूर व वैजापूर येथील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत दिले.


या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते अविनाश अभ्यंकर, आमदार मंगेश सांगळे, संपर्कप्रमुख सतीश नारकर जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, डॉ. सुनील शिंदे, भास्कर गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा व तालुक्यातील कार्यकारिणीमध्ये फेरबदल करणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी या वेळी दिली.


नवीन बदलांमध्ये तीन जिल्हाध्यक्षांऐवजी एक जिल्हाध्यक्ष, दोन विधानसभा मिळून चार जिल्हा सचिव, एक जिल्हा उपाध्यक्ष, प्रत्येक तालुक्यात एक तालुकाध्यक्ष व शहरात एकच शहरप्रमुख व चार उपाध्यक्ष या प्रमाणे रचना असणार असल्याची माहिती सहकार सेनेचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी या वेळी दिली. या वेळी पक्षात नव्याने दाखल झालेले रामहरी जाधव, बादशहा पटेल यांच्यासह तालुकाप्रमुख काकासाहेब चापे, प्रशांत सदाफळ, सुधाकर जाधव, जि.प. सदस्य संतोष जाधव, चंद्रकांत गवळी, तालुका संघटक बाबासाहेब चव्हाण, मच्छिंद्र पठाडे, मुकुंद पाठे, अशोक कराळे आदींचा सत्कार केला.