आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Irragation Alagetion In Coverage Of Sit ;dr Chital\'s Confession

एसआयटीच्या कार्यकक्षेत सिंचनाचे ‘आरोप’ नाहीत; डॉ. चितळे यांची कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिंचन घोटाळा चौकशीसाठी जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या कार्यकक्षेत आरोपांची शहानिशा करण्याची बाब येत नसल्याचे उघड झाले आहे. याचाच अर्थ जलसंपदाकडून देण्यात येणा-या कागदपत्रांच्या आधारेच चौकशी होणार आहे. या संदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कार्यकक्षेत दुरुस्तीची मागणी केली असून, तसे न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला. डॉ. चितळे यांनी मात्र भाष्य करण्यास नकार दिला.

70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून राज्यात मोठे रणकंदन झाले होते. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात
एसआयटीच्या मागणीवरून गदारोळ झाला होता. सरकारने चितळे यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीची घोषणा केली. एसआयटीचे कार्यालय औरंगाबादेत आहे.

एसआयटीच्या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील सर्व आरोपांची चौकशी व्हावी अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. त्यानुसार विनोद तावडे यांनी आपल्याकडील काही पुरावे समितीला देण्यासंदर्भात चितळे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यावर चितळे यांनी आरोपांची शहानिशा करणे हे एसआयटीच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, चितळे यांच्याशी संपर्क साधला असता तावडे यांचे वक्तव्य मीदेखील ऐकले आहे. पण मला याविषयी मला काहीही बोलायचे नाही, असे ते म्हणाले.