आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२६७ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोच्या कामांवर एक छदामही खर्च नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळामध्ये मजुरांसाठी रोजगार हमी योजना तारणहार ठरत असताना मराठवाड्यातील ६९७९ ग्रामपंचायतींपैकी २२६७ ग्रामपंचायतींनी गेल्या वर्षभरात रोहयोच्या कामांवर एक रुपयाही खर्च केलेला नाही. रोहयोच्या वर्षभरातील कामकाजाच्या अहवालावरून ३२ टक्के ग्रामपंचायतींनी पैसे खर्च केले नसल्याचे उघडकीस आले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने रोहयोची कामे करावीत, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.

चार वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ असल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. शिवाय,ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांच्या उदासिनताही यासाठी कारणीभूत आहे. वर्षभरात मराठवाड्यात रोहोयोच्या कामांवर ५०० कोटी ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले. यात अकुशल कामांवर ३२९ कोटी ८४ लाख खर्च झाला आहे, तर कुशल कामांवर १४८ कोटी ११ लाख ९६ हजार रुपये खर्च झाला. प्रशासकीय कामांवर २२ कोटी १८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ३५ कोटी ३३ लाख, हिंगोली ३३ कोटी ९ लाख, नांदेड ५४ कोटी, उस्मानाबाद ६४ कोटी ८५ लाख, बीड १०९ कोटी ७१ लाख आणि परभणी जिल्ह्यात ९६ कोटी १४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात ५०५ ग्रामपंचायतींची रोहयोकडे पाठ
जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, पैठण या तीन तालुक्यांत दुष्काळाची भीषण स्थिती आहे. त्यामुळे शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. मात्र जिल्ह्यात ९१९ ग्रामपंचायतींपैकी ५०५ ग्रामपंचायतींनी शून्य टक्के खर्च केला. मराठवाड्यात रोहयो मजुरांची सर्वांत कमी संख्यादेखील औरंगाबाद जिल्ह्यात आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी गेल्या आठवड्यात रोहयोचा कामांचा आढावा घेत कामे वाढवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या रोहयोची ५४५ कामे सुरू असून त्यावर ५७५२ मजूर उपस्थित आहेत.
पुढे वाचा, ...तर गावचा विकास
बातम्या आणखी आहेत...