आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम पर्सनल लॉ कुणीही कधीही बदलू शकत नाही: वलीउल्ला फलाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्वातंत्र्यापूर्वीपासून मुस्लिम पर्सनल लॉ चालू आहे आणि पुढेही चालत राहील. त्यामुळे हा कायदा कुणीही अाणि कधीही बदलू शकत नाही, असे मत दिल्ली येथील जमाअत-ए-इस्लामी िहंदचे ऑल इंडिया सचिव मौलाना वलीउल्ला सईदी फलाई यांनी व्यक्त केले. 

जमआत-ए-इस्लामी हिंदतर्फे मुस्लिम पर्सनल लॉ जनजागृती पंधरवडा कार्यक्रमाला २३ एप्रिलपासून सुरुवात झाली. रोशन गेट येथे सायंकाळी आयोजित जाहीर सभेत मौलाना वलीउल्ला सईदी फलाई बोलत होते. ते म्हणाले की, आम्हाला घटनेने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार आम्ही जगत आहोत. कोणतेही सरकार असू द्या, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामध्ये कुणाचेही हस्तक्षेप चालणार नाही. शरियतनुसार सर्व गोष्टींचे पालन केले जाईल. मुस्लिम समाजातही हुंड्यासारखी कुप्रथा वाढीस लागली आहे. 

इस्लाममध्ये लग्न साध्या पद्धतीने करण्याचे सांगण्यात आले आहे. त्याचे पालन होणे गरजेचे आहे. आज हुंड्यामुळे लाखो तरुणींचे लग्न होत नाही. बडेजाव करता लग्न करणे काळाची गरज आहे. इस्लाममध्ये पुरुषांएवढाच अधिकार महिलांना दिलेला आहे. चुकीच्या गोष्टींना इस्लाममध्ये थारा नाही, असे ते म्हणाले. या वेळी जमाअत-ए-इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष इलायास फलाई, मौलाना नसीम मिफ्ताई, मौलाना मुजीबउल्लाह, हाफिज इक्बाल अन्सारी, अब्दुल रहेमान नदवी, डाॅ. सदरुल हसन नदवी, मौलाना महेफुजउर्र रहेमान, आदिल मदनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक हाफिज जावेद अहेमद खान यांनी केले. 

तलाकवर अनावश्यक चर्चा...
मुस्लिम पर्सनल लॉ कुणीही बदलू शकत नाही िकंवा बदलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये. मुस्लिम बांधव ते कदापिही सहन करणार नाही. आज राजकीय नेते आणि मीडियामध्ये वारंवार तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, शरियतवर अनावश्यक पद्धतीने चर्चा घडवून आणली जात आहे. काही प्रसारमाध्यमांकडून जाणूनबुजून चुकीची माहिती पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक मुस्लिम बांधवाने पर्सनल लॉ काय आहे हे जाणून घेणे आवश्यक असल्याचे फलाई यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...