आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 हजार चौरस फुटांपर्यंत मनपाकडून बांधकाम परवानगीची गरज नाही, तरीही दीड महिन्‍यात एकही प्रस्‍ताव नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बांधकाम परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर मनपाकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जातो. यातून सामान्यांची सुटका करण्यासाठी मुंबई वगळता राज्यातील अन्य मनपा हद्दीत दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना मनपाच्या परवानगीची गरज नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला.
 
बांधकाम करणाऱ्याने वास्तुविशारद किंवा नोंदणीकृत अभियंत्याचा केवळ नकाशा सादर करावा, असे निर्णयात म्हटले होते. परंतु गेल्या दीड महिन्यात असा एकही अर्ज आलेला नाही. नागरिक बांधकाम परवानगीसाठीच अर्ज करताना दिसताहेत. एक तर वास्तुविशारद किंवा अभियंते धोका पत्करण्यास तयार नाहीत किंवा नागरिकांचा या नव्या निर्णयावर विश्वास नाही, अशा दोन गोष्टी यामागे असाव्यात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

शासन निर्णयानुसार दोन हजार चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मनपाच्या वतीने पाहणी करून भोगवटा प्रमाणपत्र दिले जाईल. मात्र, नकाशानुसार किंवा नगर रचना खात्याच्या नियमानुसारच बांधकाम व्हायला हवे. अन्यथा संबंधित वास्तुविशारद किंवा अभियंत्यावर गुन्हा नोंदवला जाईल. बांधकाम करणाऱ्याच्या विरोधातही तशीच कारवाई केली जाईल. सर्वाधिक बांधकामे ही दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या जागेवरच होतात. त्यांना याचा लाभ होईल, असे सरकारला अपेक्षित होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा निर्णय जाहीर झाला आणि लगेच अमलातही आला. 
 
एकही फाइल नाही : अजूनपर्यंत एकही फाइल आली आहे. त्यामागील कारणे नागरिक वास्तुविशारदच सांगू शकतील, असे नगर रचना विभागाचे सहायक संचालक पवन ओलुरकर म्हणाले. तर आधी संभ्रम होता. आता चित्र स्पष्ट झाले आहे, आता अर्ज येतील, असे वास्तुविशारद संघटनेचे अध्यक्ष सुनील भाले यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...