औरंगाबाद - राज्य शासनाने गुरुवारपासून घरगुती सिलिंडरवरील सरचार्ज तीन रुपयांनी कमी केल्यामुळे शहरातील ग्राहकांना अनुदानित सिलिंडर 455.50 ऐवजी 452.50 रुपयांत घरपोच मिळेल. केंद्र सरकारने 3 जुलै रोजी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत 16.50 रुपयांची वाढ केली होती. राज्य शासनाने करात कपात केल्यामुळे सिलिंडरचे दर तीन रुपयांनी कमी झाले. गुरुवारपासून सिलिंडरचे हे दर कमी करण्यात आले असल्याचे अंबर गॅस एजन्सीचे संचालक शफिक खान यांनी सांगितले.
ती बातमी खोटी
पारिख समितीच्या शिफारशीनुसार एलपीजी सिलिंडर 250 रुपयांनी आणि रॉकेलचा दर 4 रुपयांनी वाढवला जाणार असल्याच्या बातम्यांचे पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान यांनी शुक्रवारी खंडन केले.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)