आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad New Corporators Give Affidavit For No Posters On Road

उपक्रम : नगरसेवक घेणार रस्त्यावर पोस्टर लावण्याची शपथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्डातील जनतेने मला निवडून दिले. त्याचा मला, माझ्या कुटुंबीयांना आनंद होत असला तरी तो मी जाहिरात फलकाच्या रूपात व्यक्त करणार नाही. एवढेच नव्हे, तर पुढील काळात रस्त्यावर कोणतेही फलक लावणार नाही, असे शपथपत्र नव्या कार्यकारिणीतील नगरसेवकांकडून घेतले जाणार आहे.
जागृती महिला मंच, बहुद्देशीय संस्थेने हा अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांची मदत घेतली जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी शहरात अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव फुटले होते. सर्व प्रमुख रस्त्यांवर राजकीय कार्यकर्त्यांकडून असे फलक लावले जात होते. त्याविरोधात "दिव्य मराठी'ने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली.
काही संघटनांनी आंदोलने केली. त्याची दखल घेऊन तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी महापालिकेला खडसावले. खंडपीठानेही फलकांबद्दल स्पष्ट शब्दांत आदेश दिले होते. आता जागृती मंचाने पुन्हा एक उपक्रम हाती घेतला आहे.

यासंदर्भात मंचाच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रा. भारती भांडेकर यांनी सांिगतले, संजयकुमार आता आयुक्त नाहीत आणि महापालिकेचे धोरण कायम शहर विद्रूप करणाऱ्यांना अनुकूल राहिले आहे. त्यामुळेच मंच अधिक जागरूक झाला आहे. नुकताच महापालिका निवडणुकीचा निकाल लागला असून नव्या नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये फलक लावण्याची स्पर्धा होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन आम्ही नगरसेवकांकडून शपथपत्रे घेणार आहोत.पुढील एक-दीड महिना हा उपक्रम चालणार आहे. नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना मंचाची भूमिका समजावून सांगणार आहोत.
असा राबवणार उपक्रम

शपथेचा भंग होतो का, यावर लक्ष ठेवले जाईल.
त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर प्रति नगरसेवकांकडे दिल्या जातील.
त्यांच्या सह्या झाल्यावर त्यांची नावे जाहीर केली जातील.
शपथपत्राचा एक नमुना तयार केला जाणार आहे.
त्याची प्रत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना दिली जाईल.

काय असेल शपथपत्रात
निवडणूक जिंकल्याचा आनंद असला तरी तो व्यक्त करण्यासाठी बॅनर, पोस्टर, स्टिकर, जाहिरात फलकांचा वापर करणार नाही, करू देणार नाही. एवढेच नव्हे, तर पुढील राजकीय वाटचालीतही असे फलक लावण्यास विरोध करणार आहे. शिवाय कोणत्याही वर्दळीच्या रस्त्यावर स्वत:चे वाहन लावून वाहतुकीला अडथळा होऊ देणार नाही.