आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचे 70 पैकी 44 दिवस कोरडेठाक, मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी केवळ 248 मिमी पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात जून, जुलै ऑगस्ट महिन्यात ७० दिवसांपैकी केवळ २६ दिवस किरकोळ पाऊस झाला. उर्वरित ४४ दिवस कोरडेठाक गेले आहेत. औरंगाबाद परभणी जिल्ह्यात तर परिस्थिती भीषण असून या दोन्ही जिल्ह्यांत ५० दिवस पावसाचा टिपूसही पडला नाही. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी केवळ २४८ मिमी इतका पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी मराठवाड्यावर पाऊस रुसलेलाच आहे. 

त्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच खरिपाच्या मूग आणि सोयाबीन पिकांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत केवळ २१४ मिमी पाऊस झाला. ३७४ मिमी अपेक्षित सरासरीच्या केवळ ६२ टक्के इतका पाऊस झाला. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ३६४ मिमी इतका पाऊस झाला होता. जून महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात ११ दिवस पाऊस झाला, तर १९ दिवस कोरडे राहिले. जुलै महिन्यात केवळ नऊ दिवस पाऊस झाला असून २२ दिवस कोरडे राहिले, तर ऑगस्ट महिन्यात एकही दिवस पाऊस झाला नसून सर्व नऊ दिवस कोरडे राहिले आहेत. जिल्ह्यात पैठण तालुक्यात केवळ १०५ आणि गंगापूर तालुक्यात १५३, खुलताबाद १७८ आणि सोयगावमध्ये १८३ मिमी इतका पाऊस झाला आहे. 
 
परभणी जिल्ह्यात सर्वात कमी 
सर्वातकमी पाऊस परभणी जिल्ह्यात झाला. जिल्ह्यात केवळ १९१ मिमी इतका पाऊस झाला आहे. यामध्ये जून महिन्यात १,३ जुलै महिन्यात ०६ आणि ऑगस्ट महिन्यात एक दिवस असा केवळ २० दिवस पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अपेक्षित सरासरीनुसार ३९६ मिमी पाऊस अपेक्षित असताना सरासरीच्या केवळ ४८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. यामध्ये पाथरी तालुक्यात १३८, गंगाखेड- पालम १४३, गंगाखेड १६२, जिंतूर १७२ आणि मानवत तालुक्यात १८१ मिमी पाऊस झाला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...