आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण वाढले, तरीही स्क्रॅॅप वाहनांवर नाहीत निर्बंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून औरंगाबाद शहराची नोंद झाली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीच झालेले नाही. उलट वीस वर्षांपूर्वीची तीन लाखांवर वाहने विषारी धूर ओकत धावत आहेत. प्रदूषणाचा स्तर धोक्याची पातळी गाठत असल्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून जुनाट वाहने प्रदूषणाबरोबरच अपघातासही सर्वाधिक कारणीभूत ठरत आहेत. 

वाढत्या प्रदूषणावर निर्बंध घालण्यासाठी आरटीओ, मनपा, प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते हे जाणून घेतले असता वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यास चालढकलपणा होत असून कुणीच याबाबत गंभीर नसल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले. 

वाहन प्रदूषणाकडे साफ दुर्लक्ष: प्रादेशिकपरिवहन विभागाकडे प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा आहे का, असा प्रश्न आरटीओ सर्जेराव शेळके यांना विचारला असता त्यांनी ती नसल्याचे सांगितले. आरटीओ विभाग वर्षाला २०० कोटींचा महसूल मिळवून देताे. ते पर्यावरण कर वसूल करतात. मात्र, पर्यावरण समृद्ध राहावे यासाठी उपाय करत नाही हे विशेष. 

पीयूसी तपासणी नावालाच: शहराततीन अधिकृत पीयूसी सेंटर आहेत. त्यांच्यामार्फत पेट्रोल प्रदूषके चाचणीसाठी गॅस अॅनालायझर डिझेल प्रदूषकांसाठी स्मोक मीटरद्वारे वाहनांची तपासणी करून प्रमाणपत्र दिले जाते. आरटीओ अधिकाऱ्यांनी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान केवळ ८०९ वाहनांची तपासणी केली. त्यात ५७१ म्हणजेच ७० टक्के वाहने कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन, सल्फर ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड हे वायू उत्सर्जित करत असल्याचे आढळले. नियमाप्रमाणे पीयूसी सेंटरकडून तपासणी करून घेणाऱ्या ३५८ वाहनधारकांकडून आरटीओ विभागाने लाख १२ हजारांचा दंड वसूल केला आहे. 

पीयूसी प्रमाणपत्र वाहनधारकांना आवश्यक केले आहे. ते नसेल तर त्यांनी संबंधित वाहनांवर कारवाई करून निर्बंध घालायला हवेत, असे महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जे. ए. कदम म्हणाले. 

या वाहनांचा समावेश 
राज्यात 3 हजार, तर विभागात ६०० पेक्षा अधिक बस आठ वर्षांपूर्वीच्या आहेत. मोटारसायकल स्कूटर ४८ हजार, मोपेड्स ५५००, कार जीप हजार, टॅक्सी हजारांवर, अॉटोरिक्षा हजार, ट्रॅक्टर, व्हॅन, ट्रक, लॉरी, डिलिव्हरी व्हॅन, स्कूल बस, स्टेज कॅरेज अशी विविध प्रकारची लाखांवर वाहने १५ वर्षांपूर्वीची आहेत. 

मनपाचेही दुर्लक्ष 
पुणेमहापालिका वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे मोजमाप करते. सफर यंत्रणाद्वारे मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांची तीव्रता नोंदवून उपाययोजना करते. औरंगाबाद महापालिकेचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. 
बातम्या आणखी आहेत...