आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशाचा शॉर्टकट बनलाच नाही: एम. एफ. मलिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नियोजनबद्ध मेहनत करायला हवी. कारण यशाचा शॉर्टकट आजवर बनलाच नाही आणि पुढेही बनणार नाही, असे मत नारायणा इन्स्टिट्यूटचे संचालक एम. एफ. मलिक यांनी व्यक्त केले. सेंट फ्रान्सिस शाळेच्या आॅडिटोरियममध्ये आयोजित जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या सक्सेस पार्टीप्रसंगी ते बोलत होते.
मलिक म्हणाले की, आपल्या इन्स्टिट्यूटमधून देशातील विविध नामांकित संस्थांमध्ये विद्यार्थी गेले आहेत. आयआयटी, आयआयएसटी, आयआयएसईआर, आयआयएससी या संस्थांतून तयार होणारे विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. नारायणातून मुलांप्रमाणेच मुलीदेखील यशाची शिखरे चढत आहेत. यंदा 7 विद्यार्थिनींनी देदीप्यमान यश संपादन केले आहे, याचा मला गर्व आहे. स्वप्न पाहा, ते पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध मेहनत करा, इन्स्टिट्यूटचे मार्गदर्शन आहेच. या वेळी नारायणाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झालेल्या 76 विद्यार्थ्यांना मंचावरआमंत्रित करण्यात आले. यामध्ये 7 मुलींचा समावेश होता.
35 विद्यार्थ्यांचा आयआयटी प्रवेश निश्चित:
इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झालेल्या 76 विद्यार्थ्यांपैकी 35 विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यापुढील रँकिगच्या विद्यार्थ्यांना आयआयएसटी, आयआयएसईआर आणि आयआयएससी तसेच पेट्रोलियम इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येईल. नारायणाचे 5 विद्यार्थी टॉप रँकिंगमध्ये आहेत. क्लासमधून पहिला आलेला अभिमन्यू कुलकर्णी नॅशनल रँकिंगमध्ये 566 वा ठरला तर अनिकेत गावंडर, प्रतीक बंगाले हे ओबीसी, एससी आणि एसटी कॅटेगिरीतून रँकिंगमध्ये आले आहेत.
इंजिनिअरिंगलाच जाणार
या वेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शीतल कानडे, संजना पाटील, मेधा पाटील, राजू नहार आणि भार्गवी नेती यांनी इंजिनिअरिंग करणार असल्याचे सांगितले. रिसर्च अ‍ॅँड डेव्हलपमेंट, सायन्स एज्युके शन अ‍ॅँड रिसर्च तसेच स्पेस टेक्नॉलॉजीमध्येही त्यांना प्रवेश घेता येईल. मात्र, मुलींचा कल इंजिनिअरिंगकडेच आहे.