आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची एचएमटी बंद नाही, कामगारांसाठी कोर्सेस सुरू होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तोट्यात चालणाऱ्या एचएमटी कंपन्या बंद होणार असल्या तरी औरंगाबादेतील कंपनी बंद होणार नाही. याउलट येथील कंपनीत कुशल कामगार निर्मिती करणारे कोर्सेस सुरू करून सौरऊर्जा उपकरणांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक के. एल. कैथवास यांनी दिली.

एचएमटी कंपनी बंद होणार असल्याचे वृत्त वाहिन्यांवर धडकताच औरंगाबादेतील कंपनीत चर्चा सुरू झाली. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या हस्ते अद्ययावत डेअरी मशिनरी युनिटचे मंगळवारी उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी घोषणा करीत औरंगाबादेतील युनिट बंद होणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, बुधवारी दिल्ली येथून एचएमटी कंपनी बंद होणार असल्याचे वृत्त धडकले आणि चर्चेला उधाण आले. यासंदर्भात औरंगाबाद एचएमटी कंपनीचे महाव्यवस्थापक के. एल. कैथवास यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मते, केंद्राची मदत घेता औरंगाबादेतील युनिट नफ्यात आणलेले असल्याने हे युनिट बंद होणार नाही. उलट सीपेट, इंडो-जर्मन कंपनीत कुशल कामगार तयार करणाऱ्या कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते.

ट्रॅक्टर उत्पादन बंद होईल
सार्वजनिकउपक्रमांतर्गत केंद्राच्या माध्यमातून चालवले जाणारे १९ युनिट एका युनिटच्या नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. यापैकी वॉच, बेअरिंग्ज निर्मिती करणारे तोट्यात असणारे सर्व युनिट बंद करण्याचा निर्णय झाला आहे. याशिवाय मंगळवारी मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एचएमटी ट्रॅक्टर उत्पादित करणाऱ्या कंपन्या बंद केल्या जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. येथील युनिट बंद होणार नाही. कामगारांनी निश्चिंत राहावे, असेही कैथवास यांनी स्पष्ट केले.