आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाच्या वाटेत ‘अल निनो’; मराठवाड्यात फक्त 29 मि.मी.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. 22 जून उलटल्यानंतरही विभागात सरासरी 29 मिमी पाऊस झाला आहे. ‘अल निनो’ने मान्सूनचा वारू रोखला आहे. उत्तर भारतातील उष्ण वार्‍यांचा परिणाम विभागातील पावसावर झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अल निनोचा प्रतिकूल परिणाम जून, जुलैमध्येही कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली. याचा अर्थ पाऊस झाला तरी त्यामध्ये फारसा जोर राहणार नाही. पाऊस न येण्यामागे अल निनो हेच कारण असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे.

येत्या 48 तासांत शक्यता
उन्हाळ्यात गारपीट झाली होती. त्यातच आता दिल्लीत धुळीचे वादळ आणि उष्णतेमुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. उत्तर भारतात उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे मराठवाड्यात मान्सून लांबला आहे. मात्र, येत्या 48 तासांत पावसाची शक्यता आहे.
श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ, नांदेड.

देशभरात 43 मि.मी., 45 टक्क्यांची तूट
पुणे - देशभरात 18 जूनपर्यंत 43 मि.मी. पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा 45 टक्के कमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मध्य भारतात (महाराष्टÑ, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा ही राज्ये) 31.7 मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या 66.2 मि.मी.च्या तुलनेत तो 52 टक्क्यांनी कमी आहे. दोन आठवड्यांपूर्वी आंध्र प्रदेश, तेलंगणात आलेला मान्सून अजून कमजोर आहे.

जिल्हा आजवर गतवर्षी
औरंगाबाद 18 126
जालना 18 127
परभणी 34 91
हिंगोली 21 173
नांदेड 25 147
बीड 31 97
लातूर 50 98
उ.बाद 33 75
(पावसाचे आकडे मिलिमीटरमध्ये)