आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Single NCP Leader Visited In Aurangabad City For Election Campaign

टोपे मतदानाच्या दिवशीही शहरात फिरकले नाहीत; राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेत नगरसेवक निवडून जाईल की नाही, अशी चिंता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला वाॅर्डावाॅर्डांत उमेदवार मिळाले खरे, पण त्यांच्या प्रचारासाठी प्रचारप्रमुखच फिरकले नाही.
संपर्क नेते राजेश टोपे यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती, परंतु मतदारसंघातील अंकुशनगर कारखान्याची निवडणूक असल्याचे सांगून त्यांनी प्रचारात येण्याचे टाळले. किमान मतदानाच्या दिवशी तरी ते शहरात येतील, अशी उमेदवारांची शेवटची अपेक्षा होती, पण तेही त्यांनी केले नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात काहीसा मागे पडल्याचे उमेदवारांनी सांगितले.
मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा तसेच पक्षाकडून भक्कम मदत झाली असती तर राष्ट्रवादी काँग्रेस किमान दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असता, असा दावाही उमेदवारांनी केला. काँग्रेससाठी अब्दुल सत्तार, सुभाष झांबड या आमदारद्वयींनी प्रचाराची धुसा सांभाळली. इकडे राष्ट्रवादीकडून आमदार सतीश चव्हाण एकटेच होते. मोजक्या कार्यकर्त्यांना हाताशी घेत त्यांनी ८० वाॅर्डांवर लक्ष दिले. तरीही राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.

काँग्रेसने नकार दिल्यानंतर त्यांच्या तोडीने नगरसेवक निवडून आणण्याचे पक्षाने ठरवले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासाठी सर्व जबाबदारी राजेश टोपे यांच्याकडे दिली होती अन् विशेष म्हणजे त्यांनीही ती आनंदाने स्वीकारली.मात्र, त्यानंतर एकदाच ते शहरात आले. इकडे प्रचार सुरू झाला अन् तेव्हापासून टोपे शहरात फिरकलेच नाही.
उमेदवारांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यावरही ते उपलब्ध होऊ शकले नाही. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाही.
सतीश चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्यामागे कारखान्याची निवडणूक अन्य काही कामे होती. त्यामुळे ते पालिका निवडणुकीसाठी वेळ देऊ शकले नसतील, असा युक्तिवाद त्यांनी केला तसेच चव्हाण यांचाही टोपे यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगितले.