आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून : मराठवाड्यासाठी जुलै महिना जाणार खडतर!, पहिला आठवडा पावसाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जुलैमध्ये मराठवाड्यात कोरडे दिवस जास्त राहतील, असा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे. देशभरात जुलैमध्ये पाऊस सरासरी गाठेल. उत्तर व दक्षिण कर्नाटक आणि मराठवाड्यासाठी जुलै महिना खडतर राहील असे मत स्कायमेटची सीईओ जतिन सिंह यांनी व्यक्त केले आहे. भारतीय हवामान खात्याने जुलैमध्ये मान्सून ९२ टक्क्यांच्या आसपास राहील, असे म्हटले आहे.

स्कायमेटच्या मते, देशभरात जुलैमध्ये सरासरीच्या ८४ ते ११६ टक्के पाऊस होईल. उत्तर व दक्षिण कर्नाटकातील काही जिल्हे, मराठवाडा भागात जुलैमध्ये पावसात मोठे खंड पडतील. त्यामुळे मराठवाड्यासाठी जुलै खडतर राहील.

ऑगस्टमध्ये भरपूर
स्कायमेटच्या मते, हिंदी महासागरातील डायपोल (आयओडी)सध्या सर्वसाधारण स्थितीत आहे. ऑगस्टमध्ये आयओडी अनुकूल होऊन भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेचा अंदाज
२ ते ५ जुलै या काळात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. ज्या मेडन-ज्युलियन ऑसिलेशनमुळे जूनमध्ये भरपूर पाऊस झाला ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पुन्हा परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरपूर पाऊस होईल.