आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा लाख मालमत्तांची कर आकारणीच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मालमत्ता कराबाबत आता कुठे गंभीर झालेल्या मनपाने करच लावलेल्या निवासी मालमत्तांचा आकडा एकदाचा काढला असून लाख ३१ हजार मालमत्तांना आजतागायत मनपाने कर लावला नाही. या मालमत्तांकडे थोडा थोडका नव्हे तर तब्बल ७५ कोटी रुपये कर थकला आहे. दुसरीकडे करथकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी मनपा आता वाहने, टीव्ही, फ्रिजसारखी जंगम मालमत्ता जप्त करण्याचा विचार करीत आहे.

एलबीटीचा स्रोत आटल्यानंतर महापालिकेचा आर्थिक गाडा मालमत्ता करावरच चालतो. शहरात ३० ते ४० टक्केच मालमत्ता कर वसूल होत असल्याने मनपाला विकास कामे करताना अडथळे येतात. त्यामुळे मालमत्ता कर वसुली वाढवण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मध्यंतरी थकबाकीदारांना पोलिस आयुक्तालयात बैठकीसाठी बोलावण्यात आल्यानंतर वादंग उठले होते.

मागील चार महिन्यांत मनपाने करच आकारल्या गेलेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण केले असता लाख ३१ हजार निवासी मालमत्तांना कर लावलाच नसल्याचे निष्पन्न झाले. या मालमत्तांची थकबाकी ७५ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे उपायुक्त अयुब खान यांनी सांगितले.
यादीतयार : शहरातीलमालमत्तांच्या ११३ वाॅर्डनिहाय याद्या तयार करण्यात आल्या असून त्यातून प्रभागनिहाय १०० बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी कर मेळावा बोलावण्याचे ठरवले असून सहा प्रभागांतील प्रत्येकी १०० अशा ६०० थकबाकीदाकडून मालमत्ता कर वसूल केला जाईल.

जीआयएसचे टेंडर
शहरातीलसगळ्या मालमत्तांचे जीआयएस यंत्रणेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यासाठी तिसऱ्यांदा काढलेल्या टेंडरला तीन जणांनी सहभाग नोंदवल्याने मनपाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आता एका ठेकेदाराची निवड करून या आठवड्यात काम दिले जाईल.
बातम्या आणखी आहेत...