आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रयत्न फसला, दोन कोटींसह गाळही तुंबला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारने हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी दिलेले दोन कोटी रुपये अद्यापपर्यंत वापरण्यात आलेले नाहीत. कहर म्हणजे मनपाने ही रक्कम दुसऱ्या कामांसाठी वापरण्याचे प्रयत्न केले होते, पण राज्य सरकारने ते हाणून पाडल्याचे समोर आले आहे. आता पावसाळा तोंडावर आला असताना गाळासाठी निविदा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गाळ काढण्याचे होणारे काम थातूरमातूरच होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
अवघे औरंगाबाद जायकवाडीच्या पाण्यावर तहान भागवत असताना वर्षातील किमान महिने हर्सूलचा तलाव कामाला येतो. या तलावातून रोज एमएलडी पाणी जुन्या शहरातील सुमारे १८ वाॅर्डांची तहान भागवत असते. या तलावाची देखभाल करण्यात मनपा करीत असलेल्या कुचराईमुळे सुमारे साठ हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुष्काळाची स्थिती असताना हर्सूल तलावातील गाळ काढला तर पावसाळ्यात अधिक पाणी साठवता येऊ शकते. त्यासाठी दोन वर्षांपूर्वीही गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. पण ती पूर्णत्वाला गेली नाही. यंदाही तशीच बिकट स्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने चार महिन्यांपूर्वीच या तलावातील गाळ काढण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्या निधीचा मनपाने वापरच केलेला नाही.
कंगाल मनपाच्या तिजोरीत दोन कोटी रुपये आल्याने ही रक्कम इतर कामांसाठी वापरण्याचे प्रयत्न मनपात झाले. मनपाकडून राज्य शासनाला ही रक्कम इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरू देण्याची परवानगी मागण्यात आली होती. पण सरकारने ती धुडकावून लावत दिलेला पैसा त्याच कामांसाठी वापरावा असे स्पष्ट सांगितले.

एवढे होऊनही मनपाने गाळ काढण्याचे काम लवकर हाती घेतले नाही. आता मे महिना संपत आला आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. आता कुठे मनपात या कामाची निविदा काढण्याची हालचाल सुरू झाली आहे. निविदा निघून काम सुरू होईपर्यंत पावसाळा सुरू होणार असल्याने हे काम अर्धवटच होईल यात शंका नाही.
असा आहे हर्सूल तलाव

- १०० उपसण्याचा दर प्रति ट्रॅक्टर
- ० मनपाला उत्पन्न
- ४० टँकर रोज झऱ्यातून पाणी उपसा
- ८०० प्रति टँकर विक्रीचा दर
- ४०० ट्रॅक्टर रोज बेकायदा गाळ उपसा
पाणी : 0 एमएलडी
- ०५ एमएलडी रोजचा पाणीपुरवठा
- १८ किती वॉर्ड अवलंबून
- २७ फूट तलावाची खोली
- ६.२५ दलघमी साठवण क्षमता
- ४५० एकर आकार
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, वसाहती तहानलेल्या...पाण्याची विक्री...
बातम्या आणखी आहेत...