आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - दिव्य मराठी-इंजिनिअरिंग यूथ कम्युनिटी संघटनेने एक ऑक्टोबरला ‘नो व्हेइकल डे’ अभियान हाती घेतले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी संस्था-संघटनांसोबत राजकीय पक्षही सरसावले. मनसे, मनविसे आणि जनता दल सेक्युलरचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यात सहभागी होतील.
जनता दल सेक्युलरचे प्रदेश सचिव अँड. आसाराम लहाने पाटील म्हणाले, शहरच व फुलंब्रीतील आमचे कार्यकर्ते अभियानात सहभागी होतील. मनसेचे शहर प्रमुख सुमीत खांबेकर, उपप्रमुख योगेश निकम यांनीही सायकल वापराचा निर्णय घेतला. बीएसएनएलचे कर्मचारी सकाळी 8.15 वाजता सायकल फेरी काढणार आहेत, असे जमीर उल हसन यांनी कळवले. चेलीपुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कचरू वेळंजकर म्हणाले, अभियानात आमच्यासह तेली युवक संघटना सहभागी होईल. इफको टोकिओ जनरल इन्शुरन्सचे संतोष मेवाल आणि त्यांचे 30 सहकारी सार्वजनिक वाहन, सायकलींचा वापर करणार आहेत. चाटे कोचिंग क्लासेसच्या हडको शाखेच्या 14 कर्मचार्यांनी, एसबीएन नेचर क्लब, शब्द सह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनीनेही एसटी बस किंवा सायकलने प्रवास करण्याचे ठरवले आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी ‘दिव्य मराठी’त र्शीकांत सराफ (9881300821), प्रा. शिंदे (8793969708) यांच्याशी संपर्क साधावा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.