आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Vehicle Day On First October In Aurangabad City

एक ऑक्टोबरला औरंगाबाद शहरात ‘नो व्हेइकल डे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पेट्रोल, डिझेलच्या वाढत चाललेल्या किमती आणि पर्यावरणाचा र्‍हास याविषयी मोठय़ा स्तरावर जनजागृती करण्यासाठी ‘दिव्य मराठी’- इंजिनिअरिंग यूथ कम्युनिटी या तरुणांच्या संघटनेने पुढाकार घेतला. त्याचाच एक भाग म्हणून एक ऑक्टोबरला ‘नो व्हेइकल डे’ साजरा करण्यात येईल. त्यात जागरूक नागरिक, संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाची संकल्पना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अतिथी अधिव्याख्याता प्रा. आकाश शिंदे यांनी मांडली. त्याला ‘दिव्य मराठी’ आणि इंजिनिअरिंग यूथ कम्युनिटी संघटनेने प्रतिसाद देत एक ऑक्टोबरला ‘नो व्हेइकल डे’ अभियान हाती घेण्याचे ठरवण्यात आले. या दिवशी सार्वजनिक वाहनांचा वापर करूनच कामाच्या स्थळी किंवा महाविद्यालयात पोहोचावे, असा संकल्प करण्यात आला. इंधन दरवाढ आणि पर्यावरणाच्या समस्येने चिंतित नागरिक आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘दिव्य मराठी’ तसेच इंजिनिअरिंग यूथ कम्युनिटीतर्फे करण्यात आले. इच्छुकांनी ‘दिव्य मराठी’चे श्रीकांत सराफ (9881300821), प्रा. शिंदे (8793969708) यांच्याशी संपर्क साधावा.