आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उन्हामुळे गॅस सिलिंडरसाठी नो वेटिंग; ४०% झाली घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शाळांना सुट्या, लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांमुळे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर कमी झाल्याने विक्रीतही ४० टक्के घट झाली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे वेटिंगही संपुष्टात आले आहे. बुकिंगनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच ग्राहकांना सिलिंडर वितरित केले जात आहे. बहुतेक गॅस एजन्सीजकडे एकही ग्राहक वेटिंगवर नसल्याचे समोर आले आहे.

एप्रिलच्या सुरुवातीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीत घट होत असल्याचे दिसून आले. जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत शहरात ३० हजार सिलिंडरची नियमित आवश्यकता असते. यात घरगुती सिलिंडरचा आकडा २० हजारांपर्यंत असतो. मात्र एप्रिलला सुरुवात होताच सिलिंडरच्या मागणीत मोठी घट होण्यास सुरुवात होते. मे महिन्यात तर सिलिंडरची मागणी फारच कमी असते.
याउलट ऑक्टोबर महिन्यात शहरात नियमित ५० हजार सिलिंडरपर्यंत मागणी असते. यात घरगुती सिलिंडरचा आकडा ३५ हजारांपर्यंत असतो. एकूणच हिवाळ्यात सिलिंडरची मागणी वाढते. त्यामुळे ग्राहकांचे वेटिंगही वाढलेले असते. उन्हाळ्यात मात्र एकही वेटिंग नसते.
गॅसचा कमी वापर
शाळांना सुट्या लागतात. त्यामुळे मुलांचे डबे, गरम पाण्याची व्यवस्था आणि गॅस सिलिंडरवरील इतर स्वयंपाकाची कामे कमी झाली आहेत. त्यामुळे गॅस जास्त लागत नाही. लग्नसमारंभात परिवाराची जेवणाची व्यवस्था होत असल्याने गॅसही कमी लागतो.
आमचे हॉलिडे सुरू
- उन्हाळ्यात सिलिंडरची मागणी घटते. ही मागणी ४० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने एजन्सी चालकांसाठी हॉलिडे असल्याचे जाणवत आहे. शाळा आणि पावसाळा सुरू होताच पुन्हा सिलिंडरची मागणी वाढते.
जितेंद्र कक्कड, संचालक, ओंकार गॅस एजन्सी
बातम्या आणखी आहेत...