आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात जानेवारीला निर्जळी, टँकर पुरवठ्यावरही परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतरच्यावतीने नऊ जानेवारीला फारोळा, जायकवाडी पंपहाऊस आणि नक्षत्रवाडी येथील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत संपूर्ण शहरात निर्जळी असणार आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० आणि ७०० व्यासाच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शहरातील इतर भागातही छोटी-मोठी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहरवासीयांना एक दिवस पाणी मिळणार नाही. ज्या भागांत तारखेला पाणी मिळणार होते, त्यांना दहा तारखेला, तर ज्यांना दहा तारखेला पाणी मिळणार होते, त्यांना ११ तारखेला पाणी मिळणार आहे. याचा परिणामी टँकरच्या पुरवठ्यावरही होईल.

ही कामे होणार
फारोळा नाला येथे माेठ्या जलवाहिनीच्या स्कोअर व्हाॅल्व्हचा टेलपीस बदलणे, जायकवाडी येथे पंप हाऊसला जोडणाऱ्या वाहिनीचे वेल्डिंग करणे, फारोळा पंप हाऊस येथे व्हाॅल्व्ह बदलणे, वाल्मीच्या पाठीमागील वाहिनीची गळती बंद करणे, नक्षत्रवाडी एमबीआर येथे नेटवर्क मॉडिफिकेशन क्रॉस कनेक्शन करणे आदी कामे केली जाणार आहेत.