आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत पुन्हा वीज गुल; काही भागांत 6 दिवसांनंतरही पाणी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जायकवाडीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी २० लाख भरा, असे महावितरणने सांगूनही मनपाच्या सोयीनुसार काम करण्याच्या सवयीमुळे पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा होत आहे. मंगळवारी सकाळी ८.२३ ते ९.३० पर्यंत एक तास वीज गुल झाली होती. त्यामुळे शहरातील काही भागांत पाच तास विलंबाने, तर काही भागांत सहाव्या दिवशीही पाणी आले नाही. 
 
क्रांती चौक जलकुंभ, शहागंज, जिन्सी आणि एन- च्या जलकुंभावरून ज्या भागाला पाणी येणार होते, त्या सर्व भागातील पाणीपुरवठा काही प्रमाणात विस्कळीत झाला आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता एन- च्या जलकुंभावरची वीज गुल झाली होती. त्यामुळे या जलकुंभावरून ज्या भागाला पाणी मिळणार होते, त्या भागावर परिणाम झाला. मनपाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यासह पाणीपुरवठ्याचे काम बघणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नेमका कोणत्या भागावर परिणाम झाला याची माहिती मिळू शकली नाही. 
बातम्या आणखी आहेत...