आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यातील 9 मतदारसंघांत 318 उमेदवार रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांत 318 उमेदवारांचे मिळून 479 अर्ज दाखल झाले. पूर्व मतदारसंघातून सर्वाधिक 56 उमेदवार रिंगणात आहेत. वैजापूर मतदारसंघात सर्वात कमी 20 उमेदवार आहेत.
सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस छाननी व चिन्हे वाटपासाठी असून बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. त्यामुळे एकूण किती मतदार रिंगणात राहतात, हे बुधवारी दुपारनंतरच स्पष्ट होईल. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा खऱ्या अर्थाने उठेल.