आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांना थेट माझ्यासमोर हजर करा, अमितेश कुमार यांचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे तेच जर हेल्मेट वापरत नसतील तर त्यांना सोडू नका. थेट माझ्यासमोर हजर करा, असे आदेशच आज पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी त्यांनी सर्व ठाण्यांतील पोलिस अधिकाऱ्यांना सकाळीच एसएमएस पाठवले आहेत. डीबी स्टारने हा प्रकार उघड केला आहे.

हेल्मेटसक्तीची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी वाहनधारकांची तपासणी होत आहे. पण हे करताना काही पोलिस कर्मचारी स्वत: मात्र विना हेल्मेट वाहनांवर फिरताना दिसतात. यात वाहतूक पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे कायदा नियम हे सर्वसामान्यांसाठीच आहेत काय, जे स्वत: हेल्मेट घालत नाहीत त्यांना इतरांची तपासणी करण्याचा नैतिक अधिकार आहे काय, असा सवाल वाहनधारक करत आहेत. एवढेच नव्हे, तर अनेक वाचकांनी डीबी स्टारलाही अशा पोलिसांचे फोटो पाठवले आहेत. डीबी स्टारने ते वाहतूक शाखेला पाठवले. नियम मोडणाऱ्या या पोलिसांवर काय कारवाई झाली याचा तपशील मात्र जाहीर होत नाहीये.

आयुक्तांनी घेतली दखल
दरम्यान,या सर्व घडामोडींनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना पोलिस अधिकाऱ्यांना खास एसएमएस पाठवले आहेत. हेल्मेट वापरणाऱ्या कुठल्याही पोलिस अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही. जिथे जिथे असे पोलिस दिसतील त्यांना माझ्यासमोर हजर करा, असे स्पष्ट आदेशच त्यांनी हा मेसेज पाठवून पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हे घ्या नियम मोडणारे पोलिस
काही पोलिस विनाहेल्मेट वाहने चालवतात. वाचक स्वत: त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवतात. गुरुवारपर्यंत असे काही फोटो आमच्यापर्यंत आले आहेत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या फोटोंबाबत कारवाई करून लोकांपर्यंत पोहोचवणे ही अमितेशकुमार यांची जबाबदारी आहे.

फोटो काढा, व्हॉट्सअॅप करा
वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी रस्त्यावरील पार्किंग, बेशिस्त अॅपे-ऑटो, फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फोटो आिण व्हिडिओ तुम्ही डीबी स्टारला ९०४९०६७८८८ या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करू शकता. हे फोटो वाहतूक शाखेला पाठवण्यात येतील.
बातम्या आणखी आहेत...