आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंसाठी राजशिष्टाचार मोडीत, अधिकाऱ्यांची दबावापुढे शरणागती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य हे सोमवारी औरंगाबादचा छोटेखानी दौरा करत आहेत. - Divya Marathi
आदित्य हे सोमवारी औरंगाबादचा छोटेखानी दौरा करत आहेत.
औरंगाबाद - राजशिष्टाचाराचे नियम मोडीत काढून उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळा पत्रिकेत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव टाकण्यात आले आहे. सरकारी कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करतात. त्याला रोखणे शासकीय यंत्रणाच्या अखत्यारीत येत नाही. म्हणूनच राजशिष्टाचार विभागाने सरकारी कामांची उद्घाटन पत्रिका तयार करण्यासाठी काही नियम निश्चित केले आहेत. पत्रिकेत कोणाची नावे असावीत याचीही नियमावली आहे. या पत्रिका उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत आणि त्यांनी उद्घाटक अन्य पाहुण्यांच्या नावांना संमती दिल्यावरच छापाव्यात, असेही सरकारी कार्यालयांना स्पष्ट निर्देश आहेत.
सोमवारी (२० जून) सिडको, मोंढा नाका आणि महावीर चौकातील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यासाठीच्या पत्रिका उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचल्या. तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाभोवती वर्तुळ करत हे नाव पत्रिकेत समाविष्ट करता येणार नाही, असे बजावले. उर्वरित तपशील तपासून सही, शिक्क्यानिशी पत्रिकेचा नमुना मंजूर करून दिला. मात्र, एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली आदित्य यांचे नाव कायम ठेवले आहे.

एमएसआरडीसीचे (राज्य रस्ते महामंडळ) मुख्य अभियंता दिलीप साळुंखे यांनी गुरुवारी पत्रिकेचा नमुना तयार करून उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावाखाली युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव होते. त्या खालोखाल पालकमंत्री रामदास कदम सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, राजकुमार धूत, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, संजय शिरसाट, सुभाष झांबड, विक्रम काळे, सतीश चव्हाण आदींची नावे होते.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी पत्रिकेचा नमुना मंत्रालयात सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागाकडे पाठवला. तेव्हा आदित्य ठाकरे यांच्याकडे कोणतेही सरकारी पद नसल्याने त्यांचे नाव पत्रिकेत छापता येणार नाही, असे कळवण्यात आले. म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदित्य यांच्या नावाला शाईच्या पेनाने वर्तुळ केले. हे नाव वगळून पत्रिका छापाव्यात,असे तोंडी संबंधित अधिकाऱ्यांना कळवले. पण दबावामुळे या सूचनेचे पालन झालेच नाही.
पुढे वाचा.. ‘समांतर’च्या बैठकीसाठी सेनेने शोधला नवा मार्ग
बातम्या आणखी आहेत...