आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल निनो नव्हे, आयओडी पाडणार धो धो पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माेसमी वारे अर्थात मान्सून भारताच्या समाजकारणापासून ते अर्थकारणावर परिणाम करणारा घटक. मोसमी वा-यांच्या लहरीपणामुळे मान्सूनला जुगार असे बिरुद लागले आहे. यासाठी अल निनो, ला निनो यासारखे घटक कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र, आता हिंदी महासागरच्या दोन्ही टोकांकडील पाण्याचे तापमान मान्सूनसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. यालाच इंडियन ओशन डायपोल किंवा आयओडी असे संबोधले जाते.
भारतातील पावसावर आयओडीचीच हुकूमत चालते, असे स्कायमेटसह अनेक संस्थांचे मत आहे. आयओडी अनुकूल असल्यास भारतीय उपखंडावर मान्सूनचे वारे भरपूर पाऊस पाडतात असा निष्कर्ष १९९९ मध्ये सर्वप्रथम संशोधकांनी काढला. भारतातील पावसात अल निनोपेक्षा आयओडीची महत्त्वाची भूमिका आहे.

आयओडी काय?
मान्सूनच्या हालचालीसाठी हिंदी महासागराच्या दोन्ही टोकांकडील (डायपोल) पाण्याचे तापमान महत्त्वाचे ठरते. हिंदी महासागराच्या पश्चिमेकडील भागाचे अर्थात अरबी समुद्राच्या पाण्याचे तापमान आणि पूर्वेकडील भागाचे अर्थात बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे तापमान यातील फरक म्हणजे इंडियन ओशन डायपोल (आयओडी). आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि हिंदी महासागर क्षेत्रातील इतर देशांच्या हवामानावर आयओडीचा परिणाम जाणवतो. भारतीय मान्सूनवर याचा मोठा परिणाम होतो.

आयओडीच्या तीन अवस्था
1. अनुकूल (पॉझिटिव्ह)
2. प्रतिकूल (निगेटिव्ह)
3. सर्वसाधारण (नाॅर्मल)
पुढे वाचा, प्रतिकूल अवस्थाविषयी