आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Awaiting MNS; BJP Maharashtra President Devendra Phadanvis

मनसेची वाट पाहत बसलेलो नाही; भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्या सरकारला सत्तेवरून खेचायचे असेल तर मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, पण महायुती आपल्या ताकदीने लढणार आहे, आम्ही मनसेची वाट पाहत बसलेलो नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करून महायुतीत मनसे येणार की नाही, या चर्चेला निर्णायक वळण दिले.
केंद्रातील यूपीए आणि राज्यातील आघाडी सरकारविरोधात भाजपने राज्यव्यापी जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. औरंगाबादेतून त्याचा प्रारंभ करण्यासाठी आले असताना फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत महायुती, मनसे, आघाडी सरकारचा भ्रष्टाचार आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आव्हाने यावर भाष्य केले.


मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भातील हालचालींबाबत ते म्हणाले की, येणा-या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि रिपाइं पूर्ण ताकदीने उतरणार आहे. महायुतीचा विजय निश्चित आहे, पण काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्या विरोधातील मते एकत्र आली पाहिजेत. यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत. केवळ मनसेच नाही तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यासाठी युतीचीच आवश्यकता नाही. आम्ही मनसेची वाटच पाहत बसलो आहोत, असे मुळीच नाही. राज्यात काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्या विरोधात वातावरण आहे, त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.


भाजपतील अंतर्गत गृहकलहाबाबत फडणवीस म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी दोघेही पक्षासाठी महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत. त्यामुळे पक्षात कलह वगैरे काही नसून आगामी काळात निवडणुकीसाठी एकदिलाने काम करायला भाजप सज्ज आहे.


राष्‍ट्रवादी काँग्रेसने केलेले मंत्रिमंडळातील बदल आणि नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड यावर फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळातून बाहेर गेलेली आणि आलेली नावे पाहता अजित पवारांचा प्रभाव कायम आहे. त्यामुळेच या बदलांत शरद पवारांची नव्हे तर अजित पवारांचीच सरशी झाली, असे दिसते.


प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत ते म्हणाले की पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकमताने माझी निवड केली आहे. सर्वांना सोबत घेऊन आणि त्यांच्या मदतीनेच प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार आहोत.


मुख्यमंत्री हे तर महाराष्‍ट्राचे मनमोहनसिंग!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभाराबद्दल फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक आरोप नाहीत, पण त्यांच्या सरकारमध्ये होत असलेला भ्रष्टाचार ते रोखू शकले नाहीत. आपली स्वच्छ प्रतिमा सांभाळताना खुर्चीखालून वाहणा-या भ्रष्टाचाराच्या गटारगंगेकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. केंद्रात जसे मनमोहनसिंग आहेत, तसेच महाराष्‍ट्रात चित्र आहे. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्‍ट्राचे मनमोहनसिंग आहेत!

नाही. आम्ही मनसेची वाटच पाहत बसलो आहोत, असे मुळीच नाही. राज्यात काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्या विरोधात वातावरण आहे, त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. भाजपतील अंतर्गत गृहकलहाबाबत फडणवीस म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी दोघेही पक्षासाठी महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत. त्यामुळे पक्षात कलह वगैरे काही नसून आगामी काळात निवडणुकीसाठी एकदिलाने काम करायला भाजप सज्ज आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसने केलेले मंत्रिमंडळातील बदल आणि नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड यावर फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळातून बाहेर गेलेली आणि आलेली नावे पाहता अजित पवारांचा प्रभाव कायम आहे. त्यामुळेच या बदलांत शरद पवारांची नव्हे तर अजित पवारांचीच सरशी झाली, असे दिसते. प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत ते म्हणाले की पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकमताने माझी निवड केली आहे. सर्वांना सोबत घेऊन आणि त्यांच्या मदतीनेच प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार आहोत.