आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Because The Money Is Not Left Larcenous Water

चोरीचे कारण देत पैसे घेऊनही पाणी सोडले नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिबी स्‍टार-वैजापूर तालुक्यातील उंदीरवाडी, पाशापूर, अमानतपूरवाडी, सोनवाडी, राहेगाव, लासूरगाव आणि धोंदलगाव या 7 गावांतून जाणारा कालवा आजही कोरडाच आहे. भायगावपर्यंत लायनिंगचे काम झाले, परंतु तेथून टेलपर्यंत (धोंदलगाव) लायनिंगचे काम अद्याप झाले नाही. पाटातून पाणी सहज धोंदलगावापर्यंत पोहोचू शकते. या प्रकल्पाचे लाभक्षेत्र जवळपास 55 किमी पर्यंत आहे. याचे पाणी 50 किमी पर्यंतच्या गावांना नियमितपणे मिळत आहे, परंतु या मार्गावरील कालव्यातून चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत पुढील गावांना पाणी देण्यात अडचणी येत असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. पाणी द्यायचेच नव्हते तर शेतकर्‍यांकडून पैसे का घेण्यात आले, असा सवाल या गावातील शेतकरी करत आहेत. याबाबत सोनवाडी येथील शेतकरी डॉ. मनोज ताजी यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे. डीबी स्टारने याबाबत सवाल उपस्थित केला असता दुसर्‍या आवर्तनातून या गावातील शेतकर्‍यांना निश्चित पाणी देण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे.


शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनातून शेवटच्या सात गावांना वंचित ठेवण्यात आले आहे. या शेतकर्‍यांनी रीतसर अर्ज भरून पैसे शासनाकडे जमा केले आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे त्यांना आज हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.