आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोपर्डी’मुळे मराठा समाजावर सुतक, सार्वजनिक दुर्गोत्सव साजरा करू नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोपर्डीतील घटनेमुळे मराठा समाजावर सुतक पडले आहे. त्यामुळे आनंदोत्सव साजरे करणे संयुक्तिक नाही. राज्यात कुणीही सार्वजनिक दुर्गोत्सव साजरा करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी केले. त्यांच्यातर्फे आयोजित केला जाणारा स्वरविहार क्रिस्टल दांडिया रद्द केल्याची घोषणाही त्यांना केली. घरात दुर्गापूजा करण्यास विरोध नाही, असेही ते म्हणाले.

मंगळवारी (२७ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, घटना होऊन चार महिने झाले तरीही आरोपींच्या विरोधात सरकार पक्षाने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले नाही. कोपर्डीच्या आरोपींना फाशी होईपर्यंत हे सुतक राहणार आहे. वर्षभराच्या आत आरोपींना फाशी होईल अन् पुढील वर्षी ‘क्रिस्टल’ दांडिया होईल. परंतु, यंदा राज्यातील इतर दांडिया आयोजकांनीही सुतक पाळावे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना असुरक्षिततेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आर. आर. फाउंंडेशनच्या माध्यमातून संरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये जाऊन स्वसंरक्षणाचे आत्मबळ निर्माण करून देऊ.

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचे काही पदाधिकारी भेटले. आणि सध्याचे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही, असे सांगितले. या संदर्भात पाटील म्हणाले की, फडणवीसांना भेटलेले कोण होते, त्यांनी काय म्हटले याच्याशी समाजाला देणे घेणे नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. या वेळी अभिजित देशमुख, स्वरविहारचे विनोद सरकटे, नितीन सरकटे आदींची उपस्थिती होती.

३० सप्टेंबरला सुनावणी
मराठाआरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेत १७ महिन्यांनी पहिल्यांदाच ३० सप्टेंबरला सुनावणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...