आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या नशिबी केंद्रीय मंत्रिपद मृगजळच, आठ मंत्री मध्येच पायउतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील व्यक्तीला केंद्रात मंत्रिपद तर मिळाले खरे परंतु एखादा अपवाद वगळता अनेकांनी मंत्रिपदाचा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. मराठवाड्यातील नेत्यांना संघटनेत महत्त्वपूर्ण भूमिका, राज्यात मानाचे पद, दहशतवादी हल्ला, पोटनिवडणुका तर काहींना दुर्दैवी घटनेमुळे केंद्रीय मंत्रिपद सोडावे लागले. रावसाहेब दानवे यांच्या रूपाने मराठवाड्याच्या मागासलेपणाची चर्चा होत असताना कुठेतरी आशेचा किरण दिसू लागताच पुन्हा निराशाच पदरी पडली.
एक व्यक्ती एक पद
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मराठवाड्याच्या वाट्याला कॅबिनेट व राज्यमंत्रिपदाची बक्षिसी मिळाली; परंतु शपथविधीनंतर एका आठवड्यातच केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. जालना-औरंगाबाद मतदारसंघातील खासदार रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्री करण्यात आले. नुकतीच त्यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर आता एक व्यक्ती एक पद या भूमिकेतून त्यांनाही मंत्रिपदाचा त्याग करावा लागेल.
पुढील स्‍लाडवर वाचा, आतापर्यंत मराठवाड्यातील उमेदवाराला मिळालेले मंत्रिपद...