आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Clearing Electricity Bill So Darkness In Corporation

वीज बिल न भरल्याने औरंगाबाद महापालिकेत अंधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - साडेसहा कोटींच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी जीटीएलने कडक पावले उचलली असून मंगळवारी (16 एप्रिल) चार तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांना अंधारातच काम करावे लागले. तातडीची बैठक घेऊन जीटीएलला 50 लाखांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

वीज बिलाचा भरणा न केल्यास आठ दिवसांत वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा सोमवारी (15 एप्रिल) मनपाला दिला होता. त्याप्रमाणे जीटीएलने मंगळवारीच कारवाई केली. मागील सहा महिन्यांपासून पालिकेने वीज बिलाचा भरणा केलेला नाही. मनपाकडे सहा कोटी 61 लाख एक हजार 745 रुपये थकल्याचा जीटीएलचा दावा आहे. मात्र, 3 कोटी 37 लाखांचे बिल प्राप्त झाल्याचे मनपाचे म्हणणे आहे. याच्या वसुलीसाठी जीटीएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची मुंबईत बैठक झाली होती. त्यात सक्तीने वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जीटीएलने मनपाच्या दोन्ही मुख्य इमारतींचा वीजपुरवठा 16 एप्रिल रोजी दुपारी 3.30 ते 7.20 वाजेपर्यंत खंडित केला होता. यामुळे चार तास मनपात अंधार पसरला होता. शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांनी तातडीने जीटीएलच्या अधिकार्‍यांना दालनात बोलावून बैठक घेतली. 17 एप्रिल रोजी दीड कोटी, तर उर्वरित रक्कम पंधरा दिवसांत देण्याचे आश्वासन मनपाने दिल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी दिली. बैठकीस कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता पी. आर. बनसोड, जीटीएलचे अधिकारी सुनील ववालकर आदींची उपस्थिती होती.