आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Not Forme Satar Municipal Council, It Induct In Municipal Corporation Shiv Sena

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साता-याची नगर परिषद न करता तो भागच थेट मनपा हद्दीत समाविष्ट करा, शिवसेनेचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएममुळे धोक्यात येणारे आकड्यांचे गणित पाहून साता-यातील एकगठ्ठा हिंदू मतदानावर डोळा ठेवत शिवसेनेच्या सदस्यांनी साता-याची नगर परिषद न करता तो भागच थेट मनपा हद्दीत समाविष्ट करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव शिवसेनेने आणला आहे. दुसरीकडे, मनपाने सिडको ताब्यात घेतल्यावर शहराची घडी कोलमडली असून तसाच प्रकार साता-याच्या बाबतीत होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करीत भाजपने या प्रस्तावाला विरोध करण्याची तयारी केली आहे.

मंगळवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत सातारा-देवळाई ही स्वतंत्र नगर परिषद न करता तो परिसर महापालिका हद्दीत समाविष्ट करावा अशा आशयाची राज्य सरकारकडे शिफारस करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रस्ताव मांडण्यात आला आहे. एकीकडे सातारा-देवळाई नपच्या निवडणुकीच्या तयारीला प्रशासन लागले असतानाच हा प्रस्ताव आणला जात आहे. या आधी आमदार संजय शिरसाट, महिला आघाडीच्या तत्कालीन उपजिल्हा संघटक सविता कुलकर्णी यांनी साता-याचा मनपात समावेश करावा, अशी मागणी केली होती. महापालिका निवडणूक व तिकडे सातारा नपची निवडणूक तोंडावर आली असतानाच शिवसेनेने हा प्रस्ताव आणण्यामागील कारणाचा शोध घेतला असता राजकीय कारणच समोर आले आहे.

पुढे वाचा काळ बदलला, बाजू लंगडी...