आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Giving Notice , Jaikwadi Water Day Or Night Uses

बंदी धुडकावून जायकवाडीच्या पाण्यावर दरोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - मराठवाड्याला एकीकडे भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागत असतानाच जायकवाडी धरणातून मात्र बंदी धुडकावून राजरोसपणे पाण्यावर दरोडा टाकला जात आहे. दररोज सुमारे 4 हजार शेतीपंपांद्वारे 11 कोटी 52 लाख लिटर पाण्याची धरणातून चोरी होत असल्याची धक्कादायक बाब दै. ‘दिव्य मराठी’च्या विशेष टीमच्या पाहणीत आढळून आली. सिंचनासाठी पाणी न वापरण्याचे आदेश धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या उपशाकडे सरकारी पथके डोळेझाक करत आहेत.

धरणात साठवण क्षमतेच्या केवळ 5 टक्के साठा आहे. नाशिक-नगरच्या धरणांतून 12 टीएमसी पाणी आल्याने हा साठा दिसतो. कसेबसे 4 महिने पुरेल एवढेच हे पाणी आहे. धरणांतील पाणी पिण्यासाठीच वापरण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 6 महिन्यांपूर्वी दिले आहेत. हे आदेश झुगारून धरणालगतच्या पाणलोट क्षेत्रात, उजव्या कालव्याच्या गेटजवळ मोटारींच्या सक्शन पाइपचे जाळे पसरले आहे. 110 गावांतून शेतीसाठी बेसुमार पाणी उपसा सुरू आहे. यात नेवासा, शेवगाव भागातील 60, तर कायगाव, गंगापूर, पैठण भागातील 45 पेक्षा जास्त गावे आहेत.

पाणीचोरी रोखण्यासाठी शासनाकडून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पोलिस, पाटबंधारे विभाग, वीज कंपनीच्या कर्मचा-या चे पथक नेमण्यात आले आहे; पण गेल्या 4 महिन्यांत पथकाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. ऑक्टोबर महिन्यात शासनाने वीजेवर चालणा-या मोटारी तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या वेळच्या पाहणीत 6 हजार मोटारी पाणी उपसा करत असल्याचे निदर्शनास आले होते. कारवाईत काही मोटारींची वीज कापण्यात आली होती. यावर नवा उपाय शोधून शेतक-या नी इंधनावर चालणारे पंपच लावले आहेत. बहुतांश पाणी उपसा बागायती शेतीसाठी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

19 लाख लोकांना रोज पुरेल एवढे पाणी
वर्ल्ड हेल्थ ऑ र्गनायझेशनच्या निरीक्षणानुसार प्रत्येकाला रोज किमान 125 लिटर पाण्याची गरज असते. दुष्काळी भागात हे प्रमाण 60 लिटर गृहीत धरले तर धरणातून अवैधरीत्या रोज उपसा होणा-या या पाण्यात सुमारे 19 लाख 20 हजार लोकांची तहान भागवणे शक्य आहे.

अवैध उपसा रोखणारे हे आहे पथक
* राजीव शिंदे, पथकाचे प्रमुख (तहसीलदार)
*जगदीश सरदेशपांडे (उपअभियंता, पाटबंधारे विभाग)
*एस. व्ही. नरवडे (जलपुरवठा विभाग)
* विवेक स्वामी (महावितरण)
* एस. के. पगारे (मंडळ अधिकारी)
* के.डी. नरवडे (मंडळ अधिकारी)
यांच्यासह दोन मंडळ अधिकारी, 15 तहसीलदार, बिडकीन, एमआयडीसी पैठण, पैठण शहर येथील पोलिस ठाण्याच्या अधिका-याचा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी नेमलेल्या या पथकात समावेश आहे.
मोटारी बंद केल्यास इंजिनद्वारे पाणी उपसा मोटारी बंद करण्याचे आदेश आले तेव्हा ऑक्टोबरमध्ये 6 हजार मोटारींद्वारे उपसा होत असल्याचे आढळले. काही ठिकाणी वीज कापण्यात आली. यावर पळवाट शोधत शेतक-या नी इंधनावर चालणारे इंजिनच लावले. पाणी उपसणारे बहुतांश बागायतदार असल्याचे दिसते.

पाणी पिण्यासाठीच
जायकवाडी धरणातील पाणी शेती सिंचनासाठी वापरले जाऊ नये. ते केवळ पिण्यासाठी वापरावे, असे आदेश 6 महिन्यांपूर्वीच शासनाकडून आलेले आहेत. तशा सूचनादेखील संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.’’
किसन लवांडे, अपर जिल्हाधिकारी

...तरच पाणी पुरेल
पाण्याचा हा अवैध उपसा रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. पाणी उपसा करणा-या मोटारी शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरूआहे. हा अवैध पाणी उपसा थांबला तरच जूनपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरेल.
एस.पी. भर्गोदेव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, जायकवाडी

आंदोलन करू
उद्योग, व्यावसायिकांना मुबलक पाणी दिले जाते. जालन्यासाठी 24 तास पाणी सोडले जात आहे. मग ज्यांच्या जमिनी या धरणात गेल्या त्या भूमिपुत्रांनी पाणी घेतले तर बिघडले कुठे? पाणी मिळाले नाही तर आंदोलन करू.’’
अप्पासाहेब निर्मळ, अध्यक्ष,
जायकवाडी पाणी संघर्ष कृती समिती