आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्कवादी नको, प्रॅक्टिकलवादी हवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजेंद्र रंगनाथ महाजन - Divya Marathi
राजेंद्र रंगनाथ महाजन
औरंगाबाद- बारावीतदोन वेळा नापास झाल्यामुळे सगळे काही संपले, असे वाटत असतानाच दिलासा देणारी माणसं भेटली आणि त्याचं जीवनच पार बदलून गेलं. नापासाचा शिक्का पुसून काढत त्याने सुवर्णपदकासह एमएस्सी पदवी मिळवून यशाला गवसणी घातली. जीवनात परीक्षेतील मार्कांपेक्षा प्रॅक्टिकलला महत्त्व द्यायचे, हा मूलमंत्र जपत अमेरिकेत यशस्वी करिअर करत असलेल्या राजेंद्र महाजन यांनी तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे.
औरंगाबादचे रहिवासी असलेले राजेंद्र रंगनाथ महाजन सध्या अमेरिकेत बाेस्टनजवळील शेरॉन येथे वास्तव्यास आहेत. अपयशातून साकारलेल्या यशाविषयी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीशी त्यांनी साधलेला संवाद त्यांच्याच शब्दांत...

परभणी उंडणगाव येथे माझे शालेय शिक्षण झाल्यानंतर आम्ही औरंगाबादला आलो. स. भु. महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत दोन वेळा नापास झालो. यामुळे खचलो. आता काहीच होऊ शकत नाही, असे वाटले. एका क्षणी तर घरातून पळून जाण्याचाही विचार मनात आला होता, परंतु त्याच वेळी कापसे आणि डॉ. सतीश कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्यांनी आधार दिला, समजावून सांगितले.

तरुणांसाठी महत्त्वाच्या टिप्स :
{प्रत्येक गोष्ट स्वत: करायला शिका { स्वत:वर विश्वास ठेवा.
{ काय नाही करायचे हे सांगण्यापेक्षा काय केले पाहिजे हे सांगा, स्वयंशिस्त महत्त्वाची आहे.
थ्री इडियट्स

बारावीतमी, माझे दोन मित्र प्रवीण मुळे, प्रवीण चौधरी असे तिघेही नापास झालो होतो. परंतु हे फेल्युअर आमच्यासाठी सक्सेसफुल ठरले. आम्ही त्याचा फायदा घेतला. आज ते दोघेही नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर आहेत.

१९८९ मध्ये झोरिन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची सुरुवात
१९८९मध्ये मी ‘झोरिन कॉम्प्युटर’ नावाने व्यवसायाची सुरुवात केली. त्या वेळी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही शिकवत होतो. १९९६ मध्ये व्यवसायानिमित्त मस्कत येथे काम मिळाले. पण तिथे मन रमले नाही. पाचवीत असतानाच ठरवले होते की, आपण एकदा तरी अमेरिकेला जायचे. बस्स. मग काय, मस्कतनंतर १९९८ मध्ये थेट अमेरिका गाठली. तिथे "ऑमिक्रॉन’ नावाने कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा व्यवसाय सुरू केला. काँट्रॅक्टरशिपही केली. आज १६ वर्षे झाली मी अमेरिकेत आहे.