आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not On Voters' List Yet? Enrol Now For Maharashtra Assembly

मतदार यादीत नाव नाही? विधानसभेची मतदार नोंदणी आजपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मतदारांना आपली नावे यादीत नसल्यामुळे मतदान करता आले नव्हते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी असा गोंधळ होऊ नये म्हणून शुक्रवारपासून मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्यात येत आहे. नावे वगळली गेली असलेल्यांनी आणि वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्यांनी नावनोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केले आहे.
नवीन मतदारांसाठी वयाचा दाखला, रहिवासी पत्ता, ओळखपत्राची एक झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट छायाचित्रे एवढेच पुरावे नोंदणीसाठी लागतात. तहसील कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवीन नोंदणीबरोबरच स्थलांतर, नावात दुरुस्ती आदी बाबीही या काळात करता येतील.
कागदपत्रे अशी
वयाचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड), रहिवासी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्राची एक झेरॉक्स प्रत आणि दोन पासपोर्ट छायाचित्रे नोंदणी करण्यासाठी सोबत आणावीत.
मनपासाठी हीच यादी अंतिम
विधानसभेनंतर काही दिवसांत औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या वेळी तयार झालेली यादी मनपा निवडणुकीसाठी अंतिम यादी असेल. त्यामुळे मतदारांनी या वेळीच नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.