आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Party, Vote Seeing Candidates Anna Hazare Appeal

पक्ष नव्हे, उमेदवार पाहून मतदान करा - अण्णा हजारे यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पक्षांच्या नावावर मतदान करू नका, उमेदवार बघून मतदान केले तरच संसदेत चांगले कायदे होऊ शकतील, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. पक्षांचा समूह निर्माण झाला की भ्रष्टाचार वाढतो, मग भ्रष्टाचाराची पाठराखण केली जाते, असा आरोपही त्यांनी केला.
जनहित प्रतिष्ठानने काढलेल्या लोकपाल विधेयकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन गुरुवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झाले. या वेळी झालेल्या सभेत अण्णा म्हणाले, तरुणांकडून देशाला मोठय़ा अपेक्षा आहेत. देशाचे भवितव्य घडवण्यासाठी तरुणांनी सबंध घटनांकडे डोळसपणे बघून सक्रिय रहावे, असा सल्लाही अण्णांनी दिला.