आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना नको, लिपिकांना पाठवा; बोर्डाने दिले निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - परीक्षेचे अर्ज भरून बोर्डाकडे स्वीकृतीसाठी पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांना नव्हे, संस्थेतील लिपिकास पाठवा, अशा सूचना पुन्हा एकदा बोर्डाने दिल्या असून विलंब अर्ज भरण्यात शहरातील नामांकित संस्थाच अग्रस्थानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी ३० ऑक्टोबर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. परंतु तरीदेखील शहरातील काही नामांकित महाविद्यालयांनी काही विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतवाढ देऊनही वेळेत जमा केलेले नाहीत.

अर्ज जमा करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील लिपिकांची आहे. मात्र काही महाविद्यालये अर्ज घेऊन विद्यार्थ्यांना बोर्डात पाठवत आहेत. अशी जवळपास अडीचशे प्रकरणे आहेत. महाविद्यालयांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, असे बोर्डाने म्हटले आहे.
दरम्यान, दहावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातून झालेल्या विद्यार्थ्यांनी जर स्टेट बोर्डांतर्गत अकरावी-बारावीसाठी प्रवेश घेतला असेल, तर महाविद्यालयांनी बोर्ड संलग्नता घेणे आणि त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, अन्यथा संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता येणार नाही.