आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Suitabale Ledy Teacher : First Beat Up,Now That Student Discourage

शिक्षिकेचा कळस : मारहाण केले आधी , आता त्या विद्यार्थ्‍याची करतेय खच्चीकरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निष्ठुरतेचा कळस गाठलेल्या शिक्षिकेकडून आधी मारहाण झाली. त्यामुळे एका कानाला बहिरेपण आले. त्या जबर धक्क्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार्‍या चिमुकल्या प्रशांतला मानसिक आधार देण्याऐवजी त्याचा मानसिक छळ केला जात आहे. शिक्षिका त्याला टोमणे मारत आहेत. वर्गातील विद्यार्थ्यांना त्याला टोमणे मारण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. म्हणूनच प्रचंड दबावाखाली आलेला प्रशांत मंगळवारी (19 मार्च) परीक्षेलाही जाऊ शकला नाही.

सेंट जॉन शाळेतील प्रशांत फुके या विद्यार्थ्याची ही कहाणी कोणत्याही संवेदनशील मनाला सुन्न करणारी आहे. प्रेमलता साळवे या शिक्षिकेने 23 फेब्रुवारीला प्रशांतच्या कानशिलात लगावली. हा आघात एवढा जबर होता की त्याच्या डाव्या कानातून रक्त वाहू लागले. प्रशांतच्या आईने मुख्याध्यापकांना भेटून तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दाद दिली नाही.

शाळेचे प्रशासन प्रशांतला मदत करेल असे वाटत असताना त्याच्या हृदयावर घाव केले जात आहेत. त्याचे जगणे मुश्कील केले जात आहे. वर्गामध्ये त्याने पाऊल ठेवताच वर्गशिक्षिका प्राची मिस ‘अरे, आज तुझी पेपरला बातमी आली नाही.’ असे टोमणे मारणे सुरू करतात. वर्गातील मुलांना ‘प्रशांतच्या कानातून रक्त आले का’ अशी विचारणा करतात. मुले ‘नाही, नाही’ असे ओरडू लागतात. छळाचे हे सत्र गेल्या आठवडाभरापासून सुरूच आहे. त्यामुळे प्रशांत मंगळवारी ओरल परीक्षेलाही गेला नाही. उद्या, परवाही शाळेत जाण्याचा त्याचा विचार नाही.
दै. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने आज प्रशांतची भेट घेऊन त्याची व्यथा जाणून घेतली. ती त्याच्याच शब्दांत..
कशी सुरू आहे तुझी शाळा?
मी आज नाही गेलो.
का ?
मला क्लासच्या मिस प्रीती मॅडम काहीही बोलतात. वारंवार माझ्या कानाविषयी चर्चा करतात.
तुझी मंगळवारी परीक्षा होती ?
काल मला शाळेचे सीईओ संजय आव्हाड यांनी एमजीएम रुग्णालयात नेले होते. तेथे माझ्या कानाच्या तपासण्या केल्या. त्यानंतर कान रात्रभर ठणकला. पहाटे मला चार वाजेपर्यंत झोप आली नाही.
तुला शाळेत जाण्याची भीती वाटते काय ?
हो, मला भीती वाटतेय. मला मारहाण करणार्‍या मॅडमवर पोलिसांनी कारवाई केल्यावर त्याच्या बातम्या आल्या. आता मी शाळेत जाताच शिक्षक मला ‘तू शाळेची बदनामी केलीस’ असं म्हणतात. वर्गात प्रीती मिस विचारतात, प्रशांतच्या कानातून रक्त आले होते का? मग वर्गातील मुले म्हणतात, नाही, नाही. शाळेत प्रत्येक ठिकाणी माझ्या कानाविषयी कुणी तरी बोलतच असते.