औरंगाबाद - आंदोलनाची वेळ आली की आम्हाला झेंडे घेऊन बोलावता; पण तिकीट द्यायची वेळ आली की नवरा-बायको, नगरसेवक व नेत्यांच्या पत्नी, मुलांना, पुतण्याला तिकिटे देता, हे कसले तिकीटवाटप, ही तर नेत्यांची अॅडजस्टमेंट आहे, असे सुनावत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकासह पदाधिका-यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना जाब विचारला. कला ओझांसाठी वाॅर्ड सोडवून घेता अन् आम्हाला तिकीट का देत नाही, असा सवाल करीत आता आम्ही कुणाच्या प्रचाराला येणार नाही, आम्हाला बोलावूही नका, असा सणसणीत इशाराही त्यांनी दिला. दुपारच्या या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत नेते या पदाधिका-यांची समजूत काढण्यात गुंतले होते.
शिवसेनेने काल उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात शिवसेना महिला आघाडीच्या एकाही पदाधिका-याला उमेदवारी देण्यात आली नसल्याचे समोर आले. ज्या महिलांना तिकिटे मिळाली त्या एक तर विद्यमान नगरसेवकांच्या पत्नी आहेत किंवा ताकदवान सेना पुढा-यांच्या पत्नी आहेत.
पुढे वाचा... शिवसेना महिला आघाडीच्या