आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीच्या अभिनंदन ठरावावरून सेनेत दुफळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या नोटाबंदीच्या निर्णयाला शिवसेनेचा जाहीर विरोध आहे. तरीही सेनेचा महापौर असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभागृहात नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल मोदींचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मंजूर झाला. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य नंदकुमार घोडेले यांनी भाजपच्या वतीने पुढे करण्यात आलेल्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. तरीही महापौर त्र्यंबक तुपे यांनी मोदींचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. सामान्यांना त्रास होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शनिवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू होताच माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी जुन्या नोटा चलनातून बंद करून काळा पैसा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात यावे, असा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला. त्याला भाजप सदस्यांनी अनुमोदनही दिले. परंतु घोडेले यांनी या प्रस्तावास विरोध केला. मोदींच्या या निर्णयामुळे सामान्यांना त्रास होत आहे, मोदींचे अभिनंदन करावे, असे काहीही त्यांनी केले नाही. काळा पैसा बाहेर काढत असल्याचे मोदी सांगत असले तरी त्रास मात्र सामान्यांनाच होत आहे. काळा पैसा बाळगणारे रांगेत उभे नाहीत, तर दररोजच्या वस्तू खरेदीसाठी पैसे नाहीत म्हणून सामान्य माणूस कामधंदा सोडून पैशासाठी रांगेत उभा असल्याचे घोडेले म्हणाले. सेनेच्या अन्य सदस्यांनी घोडेलेंना साथ दिली नाही. तिकडून भाजपचे सदस्य प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आक्रमक झाले होते.

भाजपचे सदस्य कितीही आक्रमक झाले तरी महापौर तुपे हा प्रस्ताव फेटाळून लावतील, कारण त्यांच्या पक्षाची भूमिकाच मोदींच्या या निर्णयाच्या विरोधात आहे, अशी सर्वांचीच अटकळ होती. परंतु तुपे यांनी मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर होत असल्याचे जाहीर केले. सामान्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, हे वाक्य मात्र त्यांनी आवर्जून वापरले. हा प्रकार म्हणजे शिवसेनेतील स्थानिक वादाचा परिपाक असल्याचे सेना नगरसेवकांचे म्हणणे होते.
बातम्या आणखी आहेत...