आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी : काँग्रेसचा आक्रोश मोर्चा - कहां गये भाई कहां गये, अच्छे दिन कहां गये'चा कार्यकर्त्यांनी दिला नारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटाबंदीच्या विरोधात सोमवारी काँग्रेसने आक्रोश मोर्चा काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. alt147कहां गये भाई कहां गये अच्छे दिन कहां गये' अशा घोषणा देण्यात आल्या. गांधी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. मात्र मोर्चाला गर्दी झाली नाही. दरम्यान, हा मोर्चा केवळ शहरापुरताच होता. त्यामुळे अपेक्षित गर्दी झाली, असा दावा शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केला.

गांधी भवन येथून दुपारी दोनच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अंबानी अदानी मालामाल, आम आदमी हो गया कंगाल', 'जनता जनादेश की ललकार, मत कर अत्याचार', अशा घोषणा देण्यात आल्या. पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. पैसे काढण्याच्या अटी जाचक आहेत. मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. मोदींनी भ्रामक स्वप्ने दाखवून सर्वसामान्यांना अडचणीत आणले, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला.

या मोर्चात माजी आमदार कल्याण काळे, माजी शहराध्यक्ष सय्यद अक्रम, महिला शहराध्यक्ष सरोज मसलगे पाटील, अनुसूचित जाती शहराध्यक्ष बाबा तायडे, शहर सेवादल अध्यक्ष अतिश पितळे, भाऊसाहेब जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मोर्चा फक्त शहराचाच होता
लोकांच्यामनात आक्रोश असला तरी मोर्चात फारशी गर्दी नव्हती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोर्चात दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते होते. मोर्चात गर्दी कमी का, याबाबत शहराध्यक्ष नामदेव पवार यांना विचारले असता हा केवळ शहरापुरताच मोर्चा होता. त्यामुळे ग्रामीण कार्यकर्ते यामध्ये नव्हते. गांधी भवन येथून निघालेल्या मोर्चात हजारावर लोकांची गर्दी होती. आम्हालाही तेवढीच अपेक्षा होती, असेही पवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...