आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सावे यांना हायकोर्टाची नोटीस, निवडीस एमआयएमच्या कादरींचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादपूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल मोरेश्वर सावे यांच्या निवडीस एमआयएमचे पराभूत उमेदवार डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. आमदार सावे यांची निवड रद्द करावी, अशी विनंती करणाऱ्या याचिकेत हायकोर्टाचे न्यायमूर्ती एन. डब्ल्यू. सांबरे यांनी आ. सावेंसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

सावे यांनी मध्यच्या याद्यांमध्ये दोन ठिकाणी नाव असल्याची बाब लपवून ठेवली. पूर्व मतदारसंघात एकूण लाख ६१ हजार ७५५ मतदार होते. त्यातील लाख ६५ हजार ४३८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला, तर ८३५ पोस्टल मते मिळाली. एकूण लाख ६६ हजार २७३ जणांनी मतदान केले. पण लाख ७५ हजार ४२९ मते मोजण्यात आली. मतदान मतमोजणीच्या मतांमध्ये हजार १५६ मते अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. १६ व्या फेरीपर्यंत डॉ. कादरी पुढे होते; पण नंतरच्या दोन फेऱ्यांमध्ये उलटफेर झाला आणि सावे निवडून आले. त्यामुळे शेवटच्या दोन फेऱ्या गृहीत धरू नयेत, अशी विनंती केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. एस. एस. काझी काम पाहत असून, त्यांना अॅड. अशोक गायकवाड, अॅड. वसीम अॅड. सईद शेख सहकार्य करत आहेत.
३० उमेदवार होते
यामतदारसंघासाठी १५ ऑक्टोबर २०१४ रोजी मतदान झाले. १९ आॅक्टोबरला मतमोजणी झाली. या मतदारसंघात एकूण ३० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी विजय मिळवला. त्यांनी एमआयएमचे उमेदवार डॉ. कादरी यांचा चार हजार २६० मतांनी पराभव केला होता.
बातम्या आणखी आहेत...